Next
महावीर जयंतीनिमित्त अमृता फडणवीस यांनी केली पूजा
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:मुंबई : भगवान महावीर स्वामी यांच्या दोन हजार ६१९व्या जयंतीनिमित्त मुंबईत कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कल्याणक महोत्सवात अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. त्यांनी भगवान महावीरची पूजा करत जैन संतांचा आशीर्वाद घेतला. संतांची भेट घेत जय महावीर लिहिलेले फुगे आकाशात सोडत त्यांनी मुलुंडमध्ये विशाल जनकल्याण शोभायात्रेची सुरुवात केली.

मुलुंड जैन महासंघाचे अध्यक्ष सुखराज नाहर यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात फडणवीस यांनी श्री सर्वोदय परशुनाथ भगवान मंदिरमधील धर्मचर्य्यांच्या उपस्थितीत जैन धर्माचे तत्त्व आणि परंपरा यांच्यानुसार सर्व विधींमध्ये सहभाग घेतला. या महोत्सवात भाजप नेते मनोज कोटक ही सहभागी झाले होते.१७ एप्रिलला सकाळपासूनच सुरू झालेल्या विविध कार्यक्रमात शोभायात्रा हे प्रमुख आकर्षण होते. या भव्य रथयात्रेत १५ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. मुलुंडमधील सर्व ४४ जैन संघटनांचे प्रतिनिधी मंडळ जैन महासंघाचे अध्यक्ष नाहर यांच्यासह चेतन शाह, चेतन देढिया, दीपक गोसर, दिनेश जलियावाला आणि नलिन शाह, फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वोदय पार्श्वनाथ मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीचे अभिषेक करून पूजन करण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बुधवारी सकाळपर्यंत सुरू होता. जैन धर्माच्या सर्व चार संप्रदायाच्या संतांच्या पवित्र निश्रा, भव्य भक्ती संगीत, दैविक स्वरूपात सजलेले रथ, पारंपारिक पोशाखांमध्ये ध्वज फडकावत हजारों तरुणांसह रंगीबेरंगी पोशाख घातलेल्या हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच गगनचुंबी इंद्रध्वजा, रथाच्या मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या या रथयात्रेचे खास आकर्षण होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search