Next
‘शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध’
प्रेस रिलीज
Thursday, October 25 | 02:14 PM
15 0 0
Share this story



मुंबई : ‘महर्षी वाल्मिकींनी दिलेल्या शिकवणीनुसार शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित २४ ऑक्टोबर २०१८ रोजी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजप उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार रामदास आंबटकर, सचिव संजय पांडे, भाजप अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, आमदार भाई गिरकर, आमदार संजय सावकारे, प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, भरत राऊत या वेळी उपस्थित होते.



बडोले म्हणाले, ‘भारताचा इतिहास दोन महाकाव्यांवर केंद्रित होतो आणि त्यातील एकाची निर्मिती ही महर्षी वाल्मिकींनी करून भारताचा इतिहास रामायणाच्या माध्यमातून जगाला दिला. महर्षी वाल्मिकींनी दिलेल्या नैतिकता, मानवता, रामराज्याची संकल्पना यासोबतच त्यांनी घालून दिलेल्या शिकवणीनुसार शोषित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.’

महर्षी वाल्मिकींनी रामायणाच्या माध्यमातून समाजहिताचे काम कसे केले पाहिजे याची शिकवण व प्रेरणा आम्हाला दिली असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पारधी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link