Next
‘मोबिक्विक’तर्फे तीन व्यवसाय प्रमुखांची नियुक्ती
प्रेस रिलीज
Thursday, July 26, 2018 | 02:41 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : भारताच्या सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंच असलेल्या ‘मोबिक्विक’ने तीन व्यवसाय प्रमुखांच्या नियुक्तींची घोषणा केली आहे. चालू वर्षामध्ये चौपट वृद्धी मिळवण्यासाठी वरिष्ठ लीडरशीप टीमच्या चालू पुनर्बांधनीसोबत संरेखित राहून नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.

दीपक बत्रा हे ‘मोबिक्विक’मध्ये प्रमुख-ऑनलाइन व्यवसाय म्हणून रुजू झाले आहेत. ऑनलाइन व्यवसायामध्ये शाश्वत वृद्धी करण्यासाठी भागीदारांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. जलज खुराना यांची प्रमुख-असंघटित रिटेलसाठी नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते मुख्यत्वाने असंघटित व्यापारी नेटवर्कद्वारे ऑफलाइन व्यवसायासाठीची जबाबदारी सांभाळतील; तसेच प्रमुख-संघटित रिटेल या पदावर चंदन जोशी यांची नियुक्ती केल्याची घोषणा ‘मोबिक्विक’ने केली आहे.

बत्रा यांना १२ हून अधिक वर्षांचा कामाचा अनुभव आहे. ते ग्राहक इंटरनेट व्यवसाय मोजमाप करण्यामध्ये व्यापक अनुभवासह ते अनुभवी महाव्यवस्थापकही राहिले आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये, ओएलएक्स इंडिया येथे विमुद्रीकरण स्थापित करणे आणि क्लासिफाइड व्यवसायासाठी राष्ट्रीयरित्या स्थावर मालमत्ता श्रेणी स्थापित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

जलज खुराना यांचा जीटीएम धोरण आणि ब्रँड उभारणीमधील व्यापक अनुभव ‘मोबिक्विक’मध्ये उपयोगात येणार आहे. त्यांना एफएमसीजी उद्योगामध्ये १३ वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा विक्री आणि विपणनाचा अनुभव आहे. त्यांनी विविध भूमिका आणि प्रदेशांमध्ये रेकिट बेन्किसर आणि डाबरसारख्या संघटनांसाठी काम केलेले आहे. त्यांचा गुरगावमधील ऑनलाइन ग्रॉसरी रिटेल स्टार्ट-अपमध्ये सह-संस्थापक म्हणून उद्योजक अनुभवही आहे.

चंदन जोशी हे लंडन आणि हाँगकाँगमध्ये क्रेडिट स्विससोबत जागतिक वित्तीय बाजारांमध्ये वित्तीय व्यापारी राहिले आहेत. २०१५मध्ये ते भारतात परतले आणि पॅकेट्स, ही एक अभिनव लास्ट माइल लॉजिस्टीक्स सर्व्हिस कंपनी त्यांनी स्थापन केली. २०१७मध्ये पॅकेट्सला नुवो लॉजिस्टीक्सने (पेपरटॅपची मुख्य कंपनी) विकत घेतल्यानंतर ते यशस्वीपणे या व्यवसायातून बाहेर पडले. त्यांच्याकडे भारतामधील उद्योजकीय अनुभवासह वित्तीय उद्योगक्षेत्र आणि गुंतवणूक बॅंकिंगमधील जागतिक अनुभव आहे.

लीडरशीप टीमच्या नियुक्तींविषयी बोलताना ‘मोबिक्विक’च्या सह-संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘मोबिक्विक हा भारतामधील सर्वांत मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच बनण्यासाठी विकसित होत आहे. वर्तमान आणि भविष्यामधील व्यवसायिक आवश्यकता ओळखून त्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत. तीन व्यवसाय प्रमुखांची नियुक्ती हा आमच्या व्यवसायिक धोरणांचा एक भाग आहे. तीन व्यवसाय प्रमुखांच्या एकत्रित ज्ञान, कौशल्य आणि अनुभव यांचा ‘मोबिक्विक’चा बाजारामध्ये जम बसवण्यासाठी फायदा होईल, असा आम्हाला विश्वास आहे. या निर्णयामुळे आमची लीडरशीप टीम ‘मोबिक्विक’मध्ये वृद्धीची नवी लाट निर्माण करण्यास सुसज्ज झाली आहे. आम्ही दीर्घकालीन आणि फलदायी सहयोगाची अपेक्षा करतो.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search