Next
‘ट्रॅव्हकार्ट’ची ‘हॅलो समर’ मोहीम
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 04:30 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ट्रॅव्हकार्ट’ या हॉलिडेज बाय साहिबजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्वसमावेशक प्रवाससेवेच्या पोर्टलच्या माध्यमातून ‘हॅलो समर’ मोहीमेची घोषण करण्यात आली. या मोहिमेद्वारे यंदाच्या उन्हाळी मोसमात जगभरातील आकर्षक ठिकाणी सुट्टीचा आनंद लुटण्याची संधी देणारी योजना प्रवाशांना दिली जात आहे.

खास निवडलेली ठिकाणे, पॅकेजेस आणि अनुभवाच्या भरपूर पर्यायांसह ग्राहकांना ३० हजार रुपयांपर्यंत सवलत मिळवण्याच्या संधीसह १० हजारांपर्यंतचे ट्रॅव्हकॅश, तसेच या मोहिमेचा भाग म्हणून मोबाईल अॅपद्वारे बुकिंग केल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळवण्याची संधी आहे.   

‘ट्रॅव्हकार्ट’चे सह-संस्थापक मनहीर सिंह सेठी म्हणाले, ‘उन्हाळी हंगाम सुरू झाला असून, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या अनेक ठिकाणांबाबत ग्राहकांनी बुकिंग आणि चौकशीसाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा यासाठी आम्ही ही मोहीम लाँच केली आहे. याचाच भाग म्हणून आम्ही मंचावरील लोकप्रिय ट्रेंड्सच्या आधारे खास निवडलेल्या ठिकाणांची ग्राहकांना ऑफर देत आहोत. ग्राहकांना सर्वोच्च दर्जा प्रदान करणे हा उद्देश ‘ट्रॅव्हकार्ट’च्या अनेक प्रयत्नांपैकी एक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शोध घेण्यासाठी आणि काही अद्वितीय प्रवासानुभवाच्या बुकिंगसाठी ते नक्कीच या संधीचा लाभ घेतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link