Next
‘गोयल गंगा’तर्फे वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप
प्रेस रिलीज
Saturday, July 07 | 01:36 PM
15 0 0
Share this story



पुणे : ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता आपले काम चोखपणे पार पाडणाऱ्या वाहतूक पोलिसांना त्यांच्या कामात त्यांना हातभार लागावा या हेतूने गोयल गंगा फाउंडेशनतर्फे बंड गार्डन येथे फाउंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.  

वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप करताना अमित गोयलया वेळी पोलिस निरीक्षक ए. वाय नवगिरे, पोलिस उपनिरीक्षक बी. बी. जगताप यांसह इतर मान्यवर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.   

‘वाढते वाहतूक, नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक अशा अनेक समस्यांचा सामना करत वाहतूक पोलिस रोज आपले काम अत्यंत निष्ठेने करत असतात. त्यांच्यामुळेच वाहतूक सुरक्षित असते. यापुढे देखील त्यांना लागेल ती मदत फाउंडेशनमार्फत केली जाईल,’ असे आश्वासन या प्रसंगी गोयल यांनी दिले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link