Next
पुण्यात ‘चला हवा येऊ द्या’ची हवा
कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात कलाकारंना टाळ्या-शिट्ट्यांनी दाद
प्रेस रिलीज
Friday, February 01, 2019 | 12:28 PM
15 0 0
Share this story



पुणे : कधी गंमती-जमती, तर कधी खट्याळ चिमटे, कधी सेटवरच्या गप्पा, तर खळखळून हसविणारे विनोदी-किस्से अशा अनोख्या हास्य जत्रेने ‘चला हवा येऊ द्या- होऊ दे व्हायरल’च्या पूर्ण चमूने पुण्यातील प्रेक्षकांना खळखळून हसविले आणि पुणेकरांनी त्यांना टाळ्या-शिट्ट्यांनी दिलखुलास दाद दिली.  

आयडियल कॉलनी येथील मैदानावर कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या महोत्सवाचा दुसरा दिवस ‘चला हवा येवू द्या’च्या टीमने गाजविला. डॉ. नीलेश साबळे, भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, अंकुर वाढवे, योगेश शिरसाट या कलाकारांनी आपल्या विनोदाद्वारे उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. भाऊ कदम यांचे व्यासपीठावर आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर थुरकटवाडीवाडीवरून थेट रंगलेल्या या कार्यक्रमात उपस्थित कलाकारांची धम्माल प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता आली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.



या वेळी गायक महेश काळे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, रावेतकर हाउसिंगचे अमोल रावेतकर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीचे हर्षद झोडगे, लाकडी घानाचे भावना व आनंद पटेल, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सुबोध भावे, गायत्री दातार, अभिज्ञा भावे, आशुतोष गोखले, क्रांती फुले, विद्या करंदीकर आदी कलाकार उपस्थित होते. या निमित्ताने गायिका आर्या आंबेकरने सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.  



सुबोध भावे म्हणाले, ‘पुण्यात अस्सल कलाकारांचे नेहमीच कौतुक होते. हीच ऊर्जा प्रेक्षकांसमोर नवीन काही तरी करण्याची ताकद देत असते. एखादी भूमिका करताना ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये त्या कलाकाराबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण होते. कुठे तरी हेच प्रत्येक कलाकाराला अपेक्षित असते. तोच आनंद आणि प्रेक्षकांचे प्रेम मी सध्या अनुभवत आहेत.’    

डॉ. साबळे म्हणाले, ‘पुण्यातील कोथरूडमध्ये टाळ्या वसूल करणे हे प्रत्येक विनोदी कलाकारासाठी महत्त्वाचे असते. हीच दाद मिळावी म्हणून आम्ही नेहमीच पुण्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच पुण्यात कार्यक्रम सादर केल्याचा आनंदच काही वेगळाच असतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link