Next
‘टायटन आयप्लस’चा ‘गूंज’शी सहयोग
प्रेस रिलीज
Saturday, April 21 | 05:14 PM
15 0 0
Share this story

मुंबई : “#IForEye” या नवीन उपक्रमाद्वारे टायटन आयप्लस भारतातील वंचित समाजघटकांना मोफत चष्मे पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘टायटन आयप्लस’ने ‘गूंज’ या पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने दृष्टिदोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. यात लोकांनी त्यांचे जुने, वापरलेले चष्मे ‘टायटन आयप्लस’ स्टोअर्समध्ये आणून द्यावेत, असे आवाहन केले जात आहे.
  
दृष्टिदोष सुधारण्याची तातडीने आवश्यकता असलेल्या, वंचित समाजघटकातील व्यक्तीची दृष्टी, केवळ एका चष्म्याने सुधारू शकते. या उपक्रमाबद्दल टायटन कंपनी लिमिटेडमधील आयवेअर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉनी तलाटी म्हणाले, ‘भारतात सुमारे ५५० दशलक्ष लोकांमध्ये दृष्टिदोष आहेत आणि त्यातील केवळ ३० टक्के चष्मा वापरतात. या तफावतीमागील मुख्य कारण म्हणजे दृष्टीत सुधारणा करण्याची गरज आहे हेच त्यांना माहीत नाही. चष्म्याची गरज, दर्जेदार नेत्रआरोग्यसेवांची उपलब्धता यांबद्दल त्यांच्यात जागरूकता नाही आणि शिवाय आर्थिक समस्या आहेतच. एक ब्रॅंड म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना शिक्षित करण्याचा, तसेच त्यांना जागतिक दर्जाचा दृष्टी अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतानाच, या उपक्रमाद्वारे आम्हाला चष्मा न परवडणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. “#IForEye” या उपक्रमाद्वारे दृष्टीदोष असलेल्यांची संख्या काही मर्यादेपर्यंत, तरी कमी करता येईल अशी आशा आम्हाला वाटते. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे घरी वापरात नसलेले चष्मे असतात. मग ते आपल्या जवळच्या टायटन आयप्लस स्टोअरमध्ये जाऊन दानरूपात देण्यास काय हरकत आहे. कोणत्याही बदलाची सुरुवात आपल्या घरातून होत असते हे आपण लक्षात ठेवू.’

‘गूंज’ ही संस्था गेल्या १९ वर्षांपासून भारतभरात दुर्लक्षित विषय व दुर्लक्षित समाजगटांसाटी काम करत आहे. दरवर्षी तीन हजार टन कपडे आणि शहरांमध्ये फारसा वापर न होणाऱ्या वस्तू उपयोगात आणण्याचे काम ही संस्था करते. शहरी भागात कचरा समजल्या गेलेल्या या वस्तूंचे रूपांतर ग्रामीण भागासाठी आवश्यक संसाधनांमध्ये केले जाते. गूंज सध्या २२ राज्यांतील अनेक भागांत काम करत असून, पाणी, स्वच्छता, शिक्षण, स्त्रियांचे आरोग्य आणि आपत्ती बचाव या क्षेत्रांतील समस्या संस्था हाताळते.

ग्रामीण समाजाच्या पायाभूत पण दुर्लक्षित गरजांवर ‘गूंज’ लक्ष केंद्रित करते आणि मूलभूत भौतिक गरजा प्रतिष्ठेने पूर्ण करण्यासाठी तेथील लोकांना साधने पुरवते. ‘टायटन आयप्लस’शी झालेल्या सहयोगाच्या माध्यमातून ‘गूंज’ दृष्टिदोषाशी झडगणाऱ्यांपर्यंत चष्मे पोहोचवण्याचे काम करणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेच्या अखेरीस, ‘टायटन आयप्लस’ स्टोअर्समध्ये जमलेले सर्व चष्मे ‘गूंज’कडे सोपवले जातील आणि ‘गूंज’ देशभरातील गरजूंपर्यंत ते पोहोचवेल.

या मोहिमेबद्दल मत व्यक्त करताना ‘गूंज’चे संस्थापक अंशू गुप्ता म्हणाले, ‘व्यवस्थित न दिसणे या समस्येचा अनेक लोकांच्या जगण्यावर अनेक प्रकारांनी परिणाम होतो. मुले नीट अभ्यास करू शकत नाहीत, वाहनचालक नीट गाडी चालवू शकत नाही. ही समस्या अगदी मूलभूत असून, ती सहज सोडवली जाऊ शकते. याचा उपाय आहे आपल्या घरात कुठेतरी पडलेले, वापरात नसलेले चष्मे. देशातील सगळे नागरिक योगदान देऊ शकतात अशा मूलभूत समस्या व गरजांकडे लक्ष वेधण्याचे काम ‘गूंज’ करत आहे. या उपक्रमामुळे प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते.’

जुने चष्मे दिल्याच्या मोबदल्यात ग्राहकांना त्यांच्या नवीन ‘टायटन आयप्लस’ फ्रेमवर २० टक्के सवत दिली जाणार आहे. हा उपक्रम १९ एप्रिल ते १४ मे या कालावधीत राबवला जाणार आहे. जुने चष्मे देशभरातील कोणत्याही ‘टायटन आयप्लस’ स्टोअरमध्ये दिले जाऊ शकतात.

‘टायटन आयप्लस’विषयी :
‘टायटन आयप्लस’ हा ‘टायटन’चा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्राहकोपयोगी व्यवसाय विभाग आहे. आयवेअर क्षेत्रात ‘टायटन’ने मार्च २००७ मध्ये प्रवेश केला. भारतातील प्रिस्क्रिप्शनवर आधारित आयवेअर उद्योगात कधीच नव्हते, अशा दर्जाचे अचूक निकष प्रस्थापित करून बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याच्या तसेच उद्योगाला नवीन ओळख देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते. 

देशभरातील २२० शहरातील ५००हून अधिक स्टोअर्स आणि ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून ‘टायटन आयप्लस’ ग्राहकांना एक संपूर्णतेचा अनुभव देते. ‘टायटन आयप्लस’ निवडीसाठी मुबलक वैविध्यासह सर्व प्रकारची आयवेअर्स एका छताखाली उपलब्ध करून देते. तपशीलवार २० पायऱ्यांमध्ये डोळ्यांची तपासणी, फ्रेम्स व लेन्सच्या निवडीसाठी व्यक्तिगत लक्ष देऊन सहाय्य आणि फ्रेम्स, सनग्लासेस व लेन्सचे मुबलक वैविध्य असा जागतिक दर्जाचा अनुभव प्रत्येक स्टोअरमध्ये ग्राहकाला मिळतो.

टायटन, फास्टट्रॅक, डॅश या हाऊस ब्रॅंड्सह मोंट ब्लांक, स्टेपर, ओकली, टॉम फोर्ड, कॅरेरा, रे-बॅन, वोह, पोर्चे आणि टॅग ह्युअर यांसारखे ब्रॅण्डसही येथे उपलब्ध आहेत. बोश अॅंड लोम्ब, अल्कॉन सिबा व्हिजन, जे अॅंड जे आणि एलिसॉर या ब्रॅंड्सच्या लेन्सेसही उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link