Next
विज्ञानाश्रमातील वैज्ञानिक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद
BOI
Tuesday, July 30, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:


पुणे : पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे संस्थापक डॉ. श्रीहरी कलबाग यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाला राज्यभरातील विद्यार्थी, संशोधक, विज्ञानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. २१ संशोधनांचे पेटंट मिळविणारे युवा संशोधक अजिंक्य कोट्टावार यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला. 

मंगळवार, ३० जुलै २०१९ रोजी हे वैज्ञानिक प्रकल्पांचे खुले प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातून शाळा, मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थांचे सदस्य, शेतकरी, ग्रामस्थांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. 


विज्ञान आश्रमातील नवीन तांत्रिक प्रकल्प,  नवीन सुविधा, शैक्षणिक प्रकल्प या बाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. घरच्या, सोसायटीच्या कचऱ्याचे कंपोस्टिंग, शेतीसाठी माती-पाणी परीक्षण, यांत्रिक शेती, मत्स्य शेती, डिस्टील्ड वॉटर प्रकल्प, फॅब्रिकेशन लॅब, मूलभूत तंत्रज्ञान, सौर उर्जा, सोलर ड्रायर, पाण्याचा पुनर्वापर, फूड टेस्टिंग लॅब, फॅब्रिक डिझाईन, हस्तकला,  माहिती तंत्रज्ञान आदी विविध विषयांवरील प्रकल्प येथे मांडण्यात आले होते.


विज्ञान आश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. ‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी विज्ञान संशोधन, उद्योजकतेच्या माध्यमातून काम करण्याचे प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे दिले जाते,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search