Next
समुपदेशन शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, August 03 | 12:15 PM
15 0 0
Share this story

औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात समुपदेशन शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. उद्घाटक म्हणून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त असणाऱ्या डॉ. मुक्ता पुरंदरे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डॉ. पुरंदरे म्हणाल्या, ‘अलीकडच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे माणूस माणसापासून दूर चालला आहे. यंत्रामुळे घरातील संवाद नाहीसा होत चालला आहे. घरातील आणि समाजातील संवाद हरवल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजच्या काळात समुपदेशनाची नितांत गरज आहे. माणसाचा संवाद कमी झाल्याने माणूस एकाकी होतो. परिणामी त्याला नैराश्य येते. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या भावना ओळखायला पाहिजेत,  त्याचबरोबर इतरांच्या भावनांचा आदर करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार न करता, त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे.’

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी महाविद्यालयातील समुदेशन कोर्सची मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भीती काढून मुक्त संवाद करायला पाहिजे. भीतीपोटी आपल्या मनातील भावना दाबून ठेवल्या, तर त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुक्त संवाद करण्याची गरज आहे.’

या कार्यक्रमाची संकल्पना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांची होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुदेशन शॉर्ट टर्म कोर्स प्रमुख प्रा. डॉ. तानाजी हातेकर यांनी केले. आयक्यूएसी कमिटीच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. किरण कुंभार, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Atul choure About 73 Days ago
Very nice
2
0

Select Language
Share Link