Next
थाटात झाले तुळशीचे लग्न
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा सोहळा
BOI
Wednesday, November 21, 2018 | 04:32 PM
15 0 0
Share this article:


पुणे : मंगलाष्टकांचे सूर... राधेकृष्ण, गोपालकृष्ण असा जयघोष... वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला... वाद्यांचा घोष... हे दृश्य होते श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्याचे. दर वर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे श्रीकृष्ण-तुलसी विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.  


या वेळी ट्रस्टचे पदाधिकारी सुनील रासने, महेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, मंदार मोडक यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक हजर होते. 

शामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. तुलसी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्ती डोक्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. प्रभात बँड आणि दरबार ब्रास बँड मिरवणुकीत वादन करत होते.


चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करत, श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर विवाह समारंभ झाला. उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण-तुलसीचे दर्शन घेतले. समाजाच्या आरोग्यासाठी, सुखासाठी प्रार्थनाही करण्यात आली. 

(या तुलसीविवाह सोहळ्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search