Next
शहापूर येथे महिला जागृती मेळावा उत्साहात
दत्तात्रय पाटील
Friday, March 08, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:



ठाणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर औद्योगिक संस्था व शहापूर तालुका शिवसेना महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शहापुरात महिला जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे उपस्थित होत्या.

या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, ‘राज्यात सध्या महिला सक्षमीकरणाचे काम जोरात सुरू असून, पुरुषांच्याबरोबरीने महिलांनी सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘चूल आणि मुल’ या संकल्पनेला कायमचा फाटा देत आज महिला सर्वच क्षेत्रांत काम करताना आघाडीवर आहे. आज केवळ महिलांनी एक दिवस महिला दिन साजरा न करता येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा उत्सव करून आपली प्रगती साधली पाहिजे. त्यासाठी शासनही कटीबद्ध आहे.’



शहापूर तालुक्यातील महिला मंडळे, बचत गट यातील महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी महिलांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सांस्कृतिक व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान स्वंयसिद्धा फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी तारमले यांनी महिलांना स्व-संरक्षणाचे धडे दिले.



या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, जिल्हा प्रमुख रश्मी निमसे, माजी आमदार दौलत दरोडा, तालुका अध्यक्षा गुलाब भेरे, काशिनाथ तिवरे, अरुण पानसरे, किरण सोकांडे, पद्माकर वेखंडे, सभापती शोभा मेंगाळ, नगर अध्यक्षा अश्विनी अधिकारी, रजनी शिंदे, योगिता धानके, उर्मिला भेरे, प्रज्ञा देशमुख, चिंतामण वेखंडे, भरत बागराव, प्रकाश वेखंडे, दीपक लकडे, स्वप्नील भेरे, सुरेश पाटील, माधुरी तारमले यांसह तालुक्यातील सर्व महिला सरपंच नगरसेवक पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य सहभागी झाले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search