Next
नंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम
मिलिंद जाधव
Monday, September 09, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this article:

कल्याण : गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने कल्याण येथील नंदादीप फाउंडेशनच्या वतीने कल्याण शहरातील कोळसेवाडी पूर्व येथे अनाथाश्रम सुरू करण्यात आला आहे. नंदादीप फाउंडेशनचे संस्थापक केतन सोनी, तसेच स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापक संदीप खांडेकर, शिल्ड संघटनेचे संस्थापक प्रशांत जाधव यांच्या हस्ते अनाथाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

अनाथाश्रमात सध्या ३० विद्यार्थी असून, हे सर्व  स्थानिक आहेत. त्यांची शैक्षणिक, तसेच संपूर्ण जबाबदारी नंदादीप फाउंडेशन, स्वामी विवेकानंद संस्था, शिल्ड संघटना यांनी घेतली आहे. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या वेळी समाजसेविका माया कांबळे, सम्यक विद्यार्थी संघटनेचे रूपेश हुमरे, शिल्ड संघटनेचे पदाधिकारी मधू आठवले, महेश घडाहिरे, रत्नदीप आठवले, साक्षी साळवी, राहुल चिलवंत, नेहा गायकवाड, स्नेहा रोकडे, शिल्पा खातिकडे, सूरज पाटील उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search