Next
हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गजानन तुप्तेवार
उपसभापतिपदी सुधाकर पाटील
नागेश शिंदे
Thursday, August 16, 2018 | 02:30 PM
15 0 0
Share this article:

गजानन तुप्तेवार, सुधाकर पाटीलहिमायतनगर (नांदेड) : हिमायतनगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्षाचे प्रशासकीय मंडळ स्थापन झाले आहे. सभापतिपदी गजानन तुप्तेवार, तर उपसभापतिपदी सुधाकर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 

प्रशासकीय मंडळाची नियुक्ती १४ ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणवीस यांनी जाहीर केली. आमदार राम पाटील-रातोळीकर यांचे निष्ठावंत व विश्वासू म्हणून ओळखले जाणारे वॉर्ड क्रमांक नऊमधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन तुप्तेवार यांची मुख्य प्रशासक म्हणून, तर सुधाकर पाटील यांची उपमुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय मंडळात एकूण १० प्रशासकांचा समावेश आहे 

हिमायतनगर नगर पंचायतीचे नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला व कार्याला शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या भागात काही दिवसांपूर्वीच नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली होती. आता कृषी उत्पन्न बाजार समितीही काँग्रेसच्या हातातून गेली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search