Next
सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, March 14 | 04:19 PM
15 0 0
Share this story

चेटीचंड महोत्सवाविषयी माहिती देताना निलेश फेरवानी, सचिन तलरेजा, सुरेश जेठवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी व सुधीर फेरवानी.

पुणे : ‘सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार ६७ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १८ मार्च  व सोमवारी १९ मार्च असे दोन दिवस हा महोत्सव साजरा केला जाणार आहे,’ अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सिंधू सेवा दलाचे सचिव सचिन तलरेजा, माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी, विनोद रोहानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दीपक वाधवानी म्हणाले, ‘ रविवारी, १८ मार्च रोजी भगवान साई झुलेलाल यांची भव्य मिरवणूक व रथयात्रा निघणार आहे. ही रथयात्रा पद्मजी कंपाऊंड येथील सिंधू सेवा दलाच्या कार्यालयापासून सायंकाळी साडे पाच वाजता निघेल. सोमवारी, १९ मार्च रोजी अल्पबचत भवन  येथे संध्याकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळा होणार आहे. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. जनरेशन नेक्स्ट डान्स अॅकॅडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण आणि जतिन उदासी व सहकार्यांनचा लाईव्ह कॉन्सर्ट या वेळी होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार हजारपेक्षा अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील.’

‘या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया उपस्थित असणार आहेत. या वेळी उल्लेखनीय कार्याबद्दल ओय फाउंडेशनच्या संस्थापक सिमरन जेठवानी, क्रिप्स फाउंडेशनचे मनोहर फेरवानी, ईश्वर कृपलानी यांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली २९ वर्ष कार्यरत आहे,’ असेही दीपक वाधवानी यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link