Next
थँक गॉड
BOI
Friday, December 28, 2018 | 10:18 AM
15 0 0
Share this article:

राग-लोभ, सुख-दुःख अशा विविध भावना मानवी जीवनात असल्यानेच प्रत्येकाला वेगळे अनुभव रोज येत असतात. अशा क्षणांनी भरलेल्या माणसांच्या गोष्टी सुकुमार नितोरे यांनी ‘थॅंक गॉड’ या कथा संग्रहातून सांगितल्या आहेत. यातील अनेक कथा सकारात्मक आहेत.

‘कॉमन मॅन’चे जीवन जगताना रंजीस आलेला ‘लॉटरी’तील मांजरेकरच्या आयुष्याला आत्मविश्वासाचे बळ मिळते ते वडिलांनी स्वप्नात येऊन दिलेल्या सल्ल्याने. प्रेम असफल ठरल्यावर अन्य मुलाबरोबर लग्न झालेल्या प्रांजळच्या आयुष्यात वैधव्य येते. दुःख सारून पुढे जात असताना मैत्रिणीच्या नवऱ्याच्या रूपात पूर्वीचा प्रियकर भेटतो; पण त्याच्याबरोबर जाण्याचा मोह ती कसा टाळते हे ‘प्रांजळ श्रीरंग’मधून समजते.

नोकरी नाही, हाती पैसा नाही अशा स्थितीत वडिलांची शस्त्रक्रिया कशी करायची, या चिंतेतील नायकाच्या मदतीसाठी शालेय मित्र धावून येतो; पण त्याने दिलेल्या पैशाचे पाकीट हरवते. एका अनामिकाच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या तोंडून ‘थॅंक गॉड’ हे शब्द बाहेर पडतात. माणसाच्या आयुष्यात घडणारे प्रसंग दहा कथांमधून समोर येतात.    

पुस्तक : थॅंक गॉड
लेखक : सुकुमार नितोरे
प्रकाशक : साने गुरुजी कथा माला
पाने : ८०
किंमत : १४० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search