Next
प्रसन्न ऑटिझम सेंटरतर्फे स्वमग्न मुलांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्त उपक्रम
BOI
Saturday, March 30, 2019 | 12:52 PM
15 0 0
Share this article:


पुणे : दोन एप्रिल रोजी असलेल्या जागतिक स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्ताने (वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे) पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटरमध्ये विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तू, त्यांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. 


साधना गोडबोले‘स्वमग्नतेबाबत (ऑटिझम) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दर वर्षी संस्थेतील मुलांनी बनवलेल्या वस्तू, चित्रे यांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. स्वमग्न मुलांमध्येदेखील वेगवेगळ्या क्षमता असतात. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. या मुलांना समाजाने सामावून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. ही मुलेदेखील मुख्य प्रवाहात येऊ शकतात. त्यासाठी समाजाने हातभार लावणे महत्त्वाचे आहे. आमच्या संस्थेतील मुलांनी साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी,’ असे आवाहन प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले यांनी केले आहे. 

पद्मजा गोडबोले यांनी १८ वर्षांपूर्वी प्रसन्न ऑटिझम सेंटरची स्थापना केली. कोणत्याही सरकारी मदतीविना आजही हे केंद्र सुरू आहे.

प्रदर्शनाविषयी : 
दिवस : मंगळवार, दोन एप्रिल २०१९
वेळ : सकाळी १० ते दुपारी तीन 
स्थळ : प्रसन्न ऑटिझम सेंटर, ८९५, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, पुणे.

(प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या कार्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search