Next
‘रॉयल एन्फिल्ड’तर्फे ‘थंडरबर्ड एक्स’ दाखल
प्रेस रिलीज
Monday, March 05, 2018 | 05:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘रॉयल एन्फिल्ड’तर्फे एक नवीन, खास पद्धतीने डिझाईन केलेली ‘थंडरबर्ड एक्स’ बाइक बाजारात आली आहे. खास कल्पनाशक्ती वापरून केलेले आजच्या युगाला साजेसे डिझाईन, काळ्या रंगाचा दिमाख आणि इतर आकर्षक रंगांचा चॉइस अशी प्रलोभने घेऊन ही बाइक दाखल झाली आहे. थंडरबर्ड ५००एक्ससाठी गेटअवे ऑरेंज आणि ड्रिफ्टर ब्लू, तर थंडरबर्ड ३५०एक्ससाठी व्हिमजिकल व्हाईट आणि रोव्हिंग रेड या खास रंगात ती उपलब्ध आहे.

२००२मध्ये आगमन झालेल्या ‘थंडरबर्ड’ने तिच्या कालानुरूप बदलत्या डिझाईन्स आणि स्टाईल्समुळे गेली पंधरा वर्षे युवा पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हीच प्रेरणा साजरी करण्यासाठी आणि शहरी तरुणांना त्यांच्यातील गुणांना बाहेर काढण्यास वाव देण्यासाठी आलेली थंडरबर्ड एक्स म्हणजे थंडरबर्डला दिलेला एक ठळक नवा ‘टि्वस्ट’ आहे आणि ‘कस्टम कुल’ असण्याची एक नवी संकल्पना आहे.

‘थंडरबर्ड एक्स’ची घोषणा करताना रॉयल एन्फिल्डचे अध्यक्ष रुद्रतेज (रूडी) सिंग म्हणाले, ‘थंडरबर्डच्या घराण्याचा मानमरातब ‘थंडरबर्ड एक्स’ ही बाईक वाढवणार आहे. आमचे रायडर्स गेली वर्षानुवर्षे रॉयल एन्फिल्ड आणि थंडरबर्डचा नवनवा अनुभव घेत आले आहेत. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही एक जास्त स्टायलिश आणि जास्त बेधडक पण तरीही जास्त आकर्षक असे मॉडेल घेऊन आलो आहोत. या मॉडेलमध्ये आणखी नवनवीन बदल घडतील आणि येणाऱ्या पिढ्या यांच्या प्रेमात पडत राहतील, अशी आमची खात्री आहे. ‘थंडरबर्ड’ आणि ‘थंडरबर्ड एक्स’ ही दोन्ही रूपे शहरातल्या रस्त्यांना एक नवा दिमाख देतील आणि हायवेवर राज्य करत राहतील. टीबीएक्समुळे तरुणाईला तिचे स्वतंत्र अस्तित्त्व अधिक निर्भयपणे आणि दिमाखात मिरता येईल.’

या नव्या बाइकच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना बिझिनेस हेड शाजी कोशी म्हणाले, ‘मध्यम आकाराच्या बाइक्समध्ये ‘थंडरबर्ड’ एक नवा उत्साह घेऊन येईल आणि ‘रॉयल एन्फिल्ड’च्या परिवारात नवनवीन ग्राहकांची भर पडेल. ‘थंडरबर्ड एक्स’ भारतातल्या सर्व प्रमुख शहरांमधील रॉयल एन्फिल्ड डीलर्सकडे आणि शोरूम्समध्ये उपलब्ध असतील. थंडरबर्ड ५००एक्सची किंमत एक लाख ९८ हजार ८९८ (एक्स शोरूम दिल्ली) आणि थंडरबर्ड ३५०एक्सची किंमत एक लाख ५६ हजार ८४९ (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे.’

थंडरबर्ड एक्स ही बाईक नव्या युगाच्या रायडरच्या स्वभावाचा, गरजांचा आणि आवडीनिवडीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. दणकट आणि तरीही सुंदर अशी काळ्या रंगातली रचना आणि तिला पूरक अशी आकर्षक रंगसंगती, ठळकपणे उठून दिसणाऱ्या टॅन्क्स इत्यादी वैशिष्ट्यांमुळे थंडरबर्ड एक्स भारतातल्या रस्त्यांवर राज्य करण्यास सिद्ध आहे.

रॉयल एन्फिल्डच्या इतिहासात पहिल्यांदाच अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्सचा वापर या बाईकमध्ये झाला आहे, ज्यामुळे एक वेगळाच डौल साधला जातो. गनस्लिंगर सीट, नवे ग्रॅब रेल्स आणि थोडा लहान केलेला रियर मडगार्ड यांच्यामुळे एक वेगळाच आणि स्वच्छ साधासरळ लूक येतो. काळ्या रंगातली रचना ही सायलेन्सर, फ्रंट फोर्क्स, साईड कव्हर्स, हेडलँप्स कव्हर, इंडिकेटर्स आणि ग्रॅब रेल्सपुरती मर्यादित आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link