Next
‘इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट’तर्फे सेमकॉन परिषद
प्रेस रिलीज
Monday, December 03 | 05:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटच्या येथील सेंटरतर्फे  (आयसीआय-पीसी) ‘सेमकॉन’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद बाणेर येथील ‘आयसर’मधील सी. व्ही. रमण ऑडिटोरियम येथे सात व आठ डिसेंबर २०१८ रोजी होणार असून, ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चॅटर्जी  (आयएएस) हे या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या विषयी माहिती देताना ‘आयसीआय-पीसी’चे अध्यक्ष उज्वल कुंटे म्हणाले, ‘या परिषदेची संकल्पना दोषमुक्त बांधकाम व उदयोन्मुख तंत्रज्ञान व साहित्य (डिफेक्ट फ्री कन्स्ट्रक्शन- इर्मजिंग टेक्नोलॉजीज अ‍ॅंड मटेरियल्स) यांवर आधारित आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा व स्मार्ट सिटीजमध्ये झपाट्याने होत असलेला विकास आणि गती, कमीत कमी कार्बन उत्सर्जन, जास्तीत जास्त गुणवत्ता आणि सुरक्षा या आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर ही परिषद होत असल्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘सेमकॉन २०१८’मध्ये प्रदर्शन व उत्पादनांचे थेट सादरीकरण होणार असून, ही परिषद म्हणजे संशोधन, सिद्धांत व सराव यांच्या एकत्रीकरणासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे.’

‘कौशल्य, ज्ञान व तंत्रज्ञानाच्या माहितीचा अभाव यांमुळे दोषमुक्त बांधकाम हे या उद्योगासाठी एक मोठे आव्हान आहे. या उद्योगात दुरूस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे व मनुष्यबळाचा वेळ खर्च होतोच; पण त्याशिवाय सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्राच्या विश्‍वसनीयतेवरही परिणाम होतो. ‘रेरा’सारख्या नवीन धोरणामुळे दोषमुक्त बांधकामासाठी सिव्हिल इंजिनीअरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांवर अधिक जबाबदारी आली आहे,’ असे कुंटे यांनी सांगितले.

‘आयसीआय-पीसी’चे सचिव प्रसाद सेवेकरी म्हणाले, ‘आमच्या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे ‘सेमकॉन’ या राष्ट्रीय पातळीवरच्या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद उद्योगांच्या गरजांवर आधारित असून, यात चर्चा केलेले विषय हे सद्यस्थितीशी सुसंगत असतात आणि त्यावर या उद्योगातील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करतात.’

या परिषदेत बांधकामामधील दोषांबाबत कायदेशीर बाबी, बांधकामाची रचना व टिकाऊपणा, गुणवत्तेचे व्यवस्थापन, कॉन्ट्रॅक्टर, सल्लागार व इतर व्यावसायिकांची यांमधील भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या परिषदेच्या संकल्पनेवर आधारित पेपर सादर करता येणार आहेत. त्यातील निवडल्या गेलेल्या तीन सर्वोत्कृष्ट पेपर्सना या परिषदेत सादर करण्याची संधी मिळणार आहे.

परिषदेविषयी :
दिवस : सात व आठ डिसेंबर २०१८
स्थळ : सी. व्ही. रमण ऑडिटोरियम, ‘आयसर’, बाणेर, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link