Next
माहेश्वरी समाजातर्फे गोवर्धन पूजन व अन्नकोट महोत्सव
BOI
Monday, November 19 | 06:17 PM
15 0 0
Share this story


पुणे : माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव उत्साहात साजरा झाला. कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या अन्नकोट महोत्सवात शहर व जिल्ह्यातील जवळपास साडेसात हजार माहेश्वरी बांधवांसह इतर समाजातील मान्यवर व भक्तगण सहभागी झाले होते.

यानिमित्त लोकांच्या रक्षणाकरिता करंगळीवर पर्वत उचलून धरणाऱ्या प्रसंगांची आठवण म्हणून गोवर्धन गिरिधारीचे पूजन आणि ५६ भोगाची (मिठाई व इतर पदार्थ) आरास करण्यात आली होती. या ५६ प्रकारच्या भोगामध्ये मिठाई, फळे, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ ठेवण्यात आले होते.


माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहाणी, अशोक राठी, हरी भुतडा, बालाप्रसाद बजाज, राजेंद्र भट्टड, मदनलाल भुतडा, शामसुंदर कलंत्री, दिलीप धूत, संतोष लढ्ढा, विजयराज मुंदडा, भंवरलाल पुंगलिया, रामबिलास तापडिया यांच्यासह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

संजय चांडक म्हणाले, ‘गोवर्धन गिरिधारी यांच्या आठवणीचा पवित्र दिवस म्हणून अन्नकोट महोत्सव साजरा होतो. दर वर्षी माहेश्वरी समाजबांधव एकत्र येऊन दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव साजरा करतात. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुण्यात औषधोपचार व अन्य कामांसाठी बाहेरून येणाऱ्या समाजबांधवांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती मुकुंदनगर या भागात अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त सॅनेटोरियम, अतिथीगृह आणि बहुउद्देशीय प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link