Next
बाबुराव अर्नाळकर
BOI
Saturday, June 09 | 03:45 AM
15 0 0
Share this story

ज्यांच्या रहस्य कादंबऱ्यांचं वाचकांना वर्षानुवर्षं व्यसन लागलं, प्रचंड प्रेम आणि लोकाश्रय मिळाला असे कादंबरीसम्राट चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ बाबुराव अर्नाळकर यांचा नऊ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
नऊ जून १९०६ रोजी अर्नाळ्यामध्ये (वसई) जन्मलेले चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ बाबुराव अर्नाळकर हे मराठी रहस्य कादंबऱ्या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट! दीड हजारांहून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी विक्रमच केला आहे. ज्यांच्या रहस्य कादंबऱ्यांचं वाचकांना वर्षानुवर्षं व्यसन लागलं, प्रचंड प्रेम आणि लोकाश्रय मिळाला असे हे कादंबरीसम्राट! त्यांच्या कादंबऱ्यांमधून गावोगावच्या वाचकांना मुंबईदर्शन होत असे. 

पोलीस अधिकारी आनंदराव, चंद्रवदन ऊर्फ काळा पहाड, कृष्णकुमारी, गोलंदाज, चारुहास, झुंजार, विजया, नेताजी, धनंजय, छोटू, पंढरीनाथ, भीमसेन, मनोरमा, मेघनाद, शालिमार, संजय, सुदर्शन, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग, अशा प्रमुख पात्रांभोवती त्यांच्या कादंबऱ्या सजलेल्या असत. चार आणे माला, प्रफुल्लमाला, रसनामाला, कांचनमाला, अशा प्रकाशनांतून त्यांच्या रहस्यकथा प्रामुख्याने प्रकाशित होत असत.

चार जुलै १९९६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link