Next
पॉपसिंगर आस्था गिल पुणेकरांच्या भेटीला
पीआर क्लबतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Friday, June 28, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘डीजेवाले बाबू जरा गाना बजा दे’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली पॉपसिंगर आस्था गिल आता पुणेकरांच्या भेटीला येत आहे. प्रथमच तिचा एकटीचा कार्यक्रम पुण्यात होत असून, तिच्या गाण्यांवर थिरकण्याची संधी पॉपम्युझिक प्रेमींना मिळणार आहे. पीआर क्लब पुणेतर्फे तीन जुलै २०१९ रोजी संध्याकाळी पाच वाजता ‘दि मिल्स’ क्लबमध्ये तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात डीजे व्हीनसच्या अनोख्या अदाकारीने होणार आहे. बादशहा या प्रसिद्ध रॅपसिंगरची अधिकृत सहगायिका असणाऱ्या आस्थाने यापूर्वी पुण्यासह अनेक शहरांत बादशहाबरोबर अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे, मात्र या वेळी ती प्रथमच तिचा एकटीचा कार्यक्रम सादर करणार आहे. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है, ‘डीजे वाले बाबू, कमरिया, प्रॉपर पटोला अशा अनेक गाण्यांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताला पाठींबा देण्यासाठी तिने नुकताच टिकटॉकबरोबर करार केला असून, पुण्यातील नृत्यदिग्दर्शिका सोनाली भदुरियाबरोबरचा तिचा व्हिडिओ आणि यूट्यूबवरील ॲन्थम प्रसिध्द झाली आहे. २०१४ मध्ये तिने ‘धुपचिक इन फुगली’ हे गाणे एका ‍ जाहिरात एजन्सीसाठी गायले होते. त्यांनतर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करत, कठोर मेहनतीने तिने स्वतःची लोकप्रिय पॉपसिंगर म्हणून ओळख निर्माण केली. 

या कार्यक्रमाची तिकीटे टिकीटएक्सप्रेस, बुकमायशो, इन्सायडर आणि पेटीएमवर उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाविषयी :
स्थळ : दि मिल्स, राजा बहादुर सिटी सेंटर, शॅरेटन ग्रॅंडच्या मागे,पुणे. 
दिवस व वेळ : बुधवार, तीन जुलै २०१९, संध्याकाळी पाचपासून पुढे  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search