Next
‘रीमाजी पडद्यावरची माझी सर्वात आवडती आई’
‘होम स्वीट होम’निमित्त सलमान खानने दिला आठवणींना उजाळा
BOI
Friday, September 21, 2018 | 12:15 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : बॉलीवूडमध्ये नव्वदच्या दशकात आईच्या भूमिकेला ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रीमा. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्यामधून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, रीमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘होम स्वीट होम’ हा मराठी चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने मराठीतून शुभेच्छा देत रीमा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रीमा यांच्याविषयी बोलताना सलमान खान म्हणाला, ‘माझे पदार्पण असलेला आणि सुपरहिट ठरलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे मला ओळख मिळाली. त्यात रीमा माझ्या आईच्या भूमिकेत होत्या. खासगी आयुष्यात मला दोन आई असल्या तरी सिनेमात मात्र माझ्या आवडीच्या आई नेहमी रीमाच राहिल्या. अतिशय प्रेमळ, समंजस अशा रीमाताईंची प्रमुख भुमिका असलेला ‘होम स्वीट होम’ चित्रपट मी नक्कीच बघणार आहे.’

सलमानने ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासह अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत,आपल्या चाहत्यांना ‘होम स्वीट होम’ चित्रपट आवर्जून बघण्याचे आवाहनही केले. 

हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून, प्रोअॅक्टिव्ह प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात रीमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत.

(सलमान खान याने खास मराठीतून दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search