Next
‘आयएफएसजी’तर्फे ‘स्टार्स ऑफ टुमॉरो’ उपक्रमाची घोषणा
प्रेस रिलीज
Thursday, December 06, 2018 | 05:48 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : दी इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्टस् गेमिंगतर्फे (आयएफएसजी) खेळाडूंना पाठबळ देणाऱ्या ‘स्टार्स ऑफ टुमॉरो’ (एसओटी) या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. सेलिंग, स्क्वॅश, टेनिस, जलतरण आणि गोल्फ यांसारख्या मुख्य प्रवाहात नसलेल्या खेळांमधील देशातील उत्कृष्ट भावी खेळाडू हेरून त्यांना पाठबळ देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या खेळाडूंना त्यांच्या खेळातील उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. 

या उपक्रमासाठी देशभरातून १६८ प्रवेशिका आल्या असून, या उपक्रमाचा अंमलबजावणी भागीदार असणाऱ्या ‘गो स्पोर्टस्’ने कठीण निवड चाचणीतून १३ निष्णात खेळाडूंची ‘आयएफएसजी’च्या ‘स्टार्स ऑफ टुमॉरो’साठी निवड केली आहे. या उपक्रमात प्रमुख योगदान असणाऱ्या ‘ड्रीम ११ फाउंडेशन’ने ‘आयएफएसजी’च्या या चांगल्या उपक्रमासाठी  कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव भूषण गगराणी, सहा वेळा बॉक्सिंग विश्वविजेती आणि पद्मभूषण सन्मानित खेळाडू मेरी कोम, ‘बीसीसीआय’चे माजी मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि ‘आयएफएसजी’चे सल्लागार प्रा. रत्नाकर शेट्टी, क्रिकेट अभ्यासक बोरिया मजुमदार, ‘ड्रीम ११’चे संचालक हर्ष जैन, ‘आयएफएसजी’चे अध्यक्ष जॉन लॉफहॅगन, ‘गो स्पोर्टस्’च्या कार्यकारी संचालक दीप्ती बोपय्या आणि फॅन्टेनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रामचंद्रन यांनी निष्णात खेळाडूंचा सत्कार केला. 

या प्रसंगी भारतातील क्रीडा कौशल्याला पाठिंबा देण्याची आणि संधी निर्माण करण्याची गरज प्रतिपादन करत ‘भारत क्रीडा महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे का?’ या विषयावर संवादही साधण्यात आला.


‘स्टार्स ऑफ टुमॉरो’ हा उपक्रमाविषयी बोलताना ‘आयएफएसजी’चे अध्यक्ष लॉफहॅगन म्हणाले, ‘भारतीय क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न आणि उपक्रम यांनी प्रेरित होऊन ‘आयएफएसजी’ला भारताला एक महान क्रीडाप्रधान देश म्हणून घडविण्याच्या कार्यात योगदान देण्याची इच्छा आहे. क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा एक भाग म्हणून खेळाच्या सर्वंकष प्रगतीला चालना देणे आणि वैयक्तिक पातळीवर पात्र खेळाडूंना मदत करणे ही आम्हाला आमची जबाबदारी वाटते.’

या उपक्रमाला सहाय्य करण्याविषयी ‘ड्रीम ११’चे संचालक जैन म्हणाले, ‘भारताला एक महान क्रीडाप्रधान देश म्हणून घडविण्याच्या फाउंडेशनच्या उद्दिष्टाच्या जवळ जाणारा असा हा उपक्रम आहे. त्यामुळे त्याच्याशी जोडले जाण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ‘खेलो इंडिया’ या भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या उपक्रमाने आम्हाला प्रेरित केले आहे आणि अशा प्रकारच्या आणखी खाजगी-सार्वजनिक भागीदारी व्हाव्यात असे आम्हाला वाटते.’

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव गगराणी म्हणाले, ‘भारतात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी सार्वजनिक-खाजगी तत्वावर भागीदारी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल. कॉर्पोरेटकडून मोठ्या वा मध्यम प्रमाणात कोणत्याही स्वरूपात मिळालेली मदत व योगदान यातून आपल्या देशाच्या क्रीडा धोरणाला चालना मिळेल. ‘आयएफएसजी’ आणि ‘ड्रीम ११’ यांच्या पाठबळामुळे तरुण खेळाडूंना त्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.’

मेरी कोम म्हणाल्या, ‘आयएफएसजीच्या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याचा मला आनंद वाटतो. भारत एक क्रीडाप्रधान देश बनण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे स्थान क्रीडा क्षेत्रात मजबूत करण्यासाठी केवळ सांघिक खेळांनाच नाही, तर व्यक्तिगत क्रीडा प्रकारांनाही पाठबळ मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय क्रीडा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम हे स्वागतार्ह पाउल आहे.’

प्रा. शेट्टी म्हणाले, ‘भारतीय क्रीडा मंत्रालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रभावी धोरण यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांमध्ये खेळ आणि खेळाडू यांच्याविषयी जागृती, औत्सुक्य आणि कौतुक वाढताना दिसत आहे. योग्य तयारी, उत्तम स्त्रोत व प्रायोजकत्व यांच्या आधारे निष्णात खेळाडूंना त्यांचे सर्वोत्तम कौशल्य दाखविणे शक्य होत आहे.’

दीप्ती बोपय्या म्हणाल्या, ‘आयएफएसजीचे अंमलबजावणी भागीदार म्हणून काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. कणखर मजबूत क्रीडा उद्दिष्टे असलेल्या, याआधी खूप चांगली कामगिरी केलेल्या, पण पाठबळ कमी असणाऱ्या तरुण निष्णात खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मदत मिळून या खेळाडूंचा वरिष्‍ठ पातळीपर्यंत जाण्याचा आणि सर्वाधिक मोठ्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search