Next
‘सेफएज्युकेट’तर्फे ‘राइट टू वोट’ जागरूकता अभियान
प्रेस रिलीज
Friday, April 12, 2019 | 12:58 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘सेफएज्युकेट’ या भारतातील सर्वांत मोठ्या प्रशिक्षण, कौशल्य आणि सल्लागार संस्थेच्या संस्थापक दिव्या जैन यांनी भारतातील ४० केंद्रांवर ‘राइट टू वोट’ जागरूकता अभियान राबविले आहे. मतदानाची संकल्पना आणि त्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी देशाच्या विविध भागांतील पाच हजार विद्यार्थ्यांशी दिव्या यांनी थेट संवाद साधला.

१७व्या लोकसभा निवडणुकीत आपले मत देण्यासाठी दिव्या यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यातील बहुतांशी मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणारे असणार हे लक्षात घेऊन त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये मत नोंदण्याच्या प्रक्रियेविषयी थोडक्यात कल्पना दिली.

देशाच्या कल्याणसाठी प्रत्येक मत किती महत्त्वाचे आहे, यावर भर देताना त्या म्हणाल्या, ‘भारतात असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना सरकारची स्थापना कशी होते, तसेच निवडणुकीच्या संदर्भात होणाऱ्या हालचालींबाबत वरवरचे ज्ञान असते. राष्ट्राच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेताना त्यांचे स्वतःचे महत्त्व त्यांनी जाणले पाहिजे. काही गोष्टींबद्दल वरकरणी त्यांना बरेचदा चीड येत असली, तरी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे आणि सुधारणेची आशा जिवंत ठेवली पाहिजे. शेवटी, ते देशाचे भवितव्य आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search