Next
गनिमी कावा
BOI
Monday, February 25, 2019 | 10:17 AM
15 0 0
Share this story

शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांनी अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्ध तंत्राने. नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे.

गनिमी काव्याने लढण्याचा मुख्य हेतू, त्याचे नियोजन, उद्दिष्टे प्रथम विषद केली आहेत. मराठ्यांनी या युद्धतंत्राचा वापर केलेल्या प्रसंगांची जंत्री यात दिली आहे. शिवाजी महाराजांनी केलेली सैन्य रचना व व्यवस्थापन, गनिमी काव्यात राखली जाणारी शिस्त, गनिमी काव्यासाठी नैसर्गिक गोष्टी व परिस्थितीचा महाराजांनी केलेला उपयोग, रणक्षेत्राची अचूक निवड याची माहिती दिली आहे.

शिवरायांची पहिली लढाई, पहिला छापा, प्रतापगडाचा प्रसंग, उघड्या मैदानातील पहिली लढाई, पन्हाळ्याहून सुटका, उंबरखिंड, लालमहालातील पराक्रम, सुरतेवर चाल, पहिली आरमारी मोहीम अशा विविध मोहिमा, युद्ध व शत्रूला नामोहरम करण्याच्या रणनीतीबद्दल सांगितले आहे.

पुस्तक : गनिमी कावा
लेखक : प्रा. नामदेवराव जाधव
प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : ५०२
किंमत : ४८० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhye About 8 Days ago
Maliki Ambar played a very part in developing the technique of guerilla Warfare in the region. The history of Ahmadnagar treates this aspect
1
0

Select Language
Share Link