Next
‘पाणी, माती, निसर्ग जपा’
डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे आवाहन
BOI
Thursday, November 01, 2018 | 06:19 PM
15 0 0
Share this article:

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’मधील प्रदर्शनाचे उद्घाटन करताना डॉ. राजेंद्रसिंह राणा, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर.

पुणे : ‘कोकणाचा वारसा, नैसर्गिक साधनसंपत्ती जपत शाश्वत विकास करण्यासाठी कोकणवासियांनी प्रयत्न करावेत. वाहून जाणारे पाणी अडवावे, जमिनीची धूप थांबवावी आणि मनुष्यबळ, बुद्धीचे विस्थापन रोखावे, त्यातून कोकणातील गावे तीर्थक्षेत्रे व्हावीत’, अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली.

डॉ. राजेंद्रसिंह राणा
‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’मधील  प्रदर्शनाचे डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी  पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जर्मनीचे ऑलिव्हर, मालदीवचे श्रीकांत, अमेरिकेचे ललीत महाडेश्वर, संयोजक संजय यादवराव, सहसंयोजक एम. क्यू. सय्यद, किशोर धारिया, वसईचे माजी महापौर राजीव पाटील, संजीवनी जोगळेकर,बाबा धुमाळ, तसेच पुण्यातील कोकणवासीयांच्या संस्थांचे तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘सर्वांच्या प्रयत्नातून कोकण हे पर्यटनाचे ग्लोबल हब झाले पाहिजे. त्यातून नव्या पिढीला पर्यटनाच्या संधी मिळतील. कोकणचे सौंदर्य देश - विदेशात पोहचवले पाहिजे. कोकणचा वारसा, दूर्ग, किल्ले जपण्यासाठी सर्वसामान्यांनीही लक्ष दिले पाहिजे.’

या प्रदर्शनामध्ये खाद्यसंस्कृती, पर्यटन, बांधकाम, रोजगार, लोककलाविषयक दालनांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search