Next
‘पेटीएम मॉल’वर ऑनलाइन कार बुकिंग सुविधा
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पेटीएम मॉल’ने यूरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रॅंड ‘रेनो’सोबत भागीदारी केली असून, या माध्यमातून ‘पेटीएम मॉल’च्या ग्राहकांना आणि संभाव्य कार खरेदीदारांना आपल्या पसंतीची ‘रेनो’ कार ऑनलाइन बुक करता येणार आहे. ही भागीदारी भारतात उपलब्ध असलेल्या आघाडीच्या ‘रेनो’ कार्सना लागू आहे. यामध्ये क्विड, डस्टर आणि कॅप्चरचा समावेश आहे.

‘पेटीएम मॉल’ने एक डिजिटल एक्स्पिरियन्स झोन सुरू केला असून, यामुळे ‘रेनो’च्या ग्राहकांना खरेदी करणे सोपे होईल. ग्राहक ‘पेटीएम मॉल’वर लॉगऑन करून आपल्या पसंतीची ‘रेनो’ इंडिया गाडी निवडू शकतात. वाहन शोधण्यासाठी ते कारचा प्रकार आणि संबंधित स्थानिक डीलर निवडू शकतात. ‘पेटीएम मॉल’च्या ग्राहकांना १० हजार रुपये टोकन रक्कम भरून बुकिंगची पुष्टी करावी लागेल. त्यानंतर ते त्यांच्या पसंतीच्या डीलरकडे जाऊन बाकीच्या औपचारिकता पूर्ण करू शकतील व पेमेंट करून कार घेऊन येऊ शकतील.

या विषयी बोलताना ‘पेटीएम मॉल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे म्हणाले, ‘आमच्या मंचावरून कार बुकिंगची सुरुवात करताना ‘रेनो’शी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘रेनो’ हा एक अत्यंत झपाट्याने वृद्धिंगत होत असलेला ऑटोमोटिव्ह ब्रॅंड आहे आणि त्यांच्या कार त्यांच्या अनोख्या स्टाइलबद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्या भारतातील कारप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत. ‘रेनो’ इंडियाशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे देशभरातील आमच्या ग्राहकांना कार बुकिंग करणे सोयीचे होईल. ते आता आपल्या घरी किंवा ऑफिसात बसून कोणत्याही वेळी विविध कार्सचा शोध घेऊन, त्यांची तुलना करून आपली आवडती कार बुक करू शकतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search