Next
महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार कृपाल पलुसकर यांना प्रदान
BOI
Thursday, July 18, 2019 | 12:33 PM
15 0 0
Share this article:

महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील के. पी. पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक कृपाल पलुसकर यांना प्रदान करताना मीरा कुमार

पुणे : नवी दिल्ली येथील माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीतर्फे दिला जाणारा महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार पुण्यातील के. पी. पॅरामेडीकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक कृपाल पलुसकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष श्रीमती मीराकुमार यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पलुसकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Swapnilraj Shinde About 35 Days ago
KP is not a name it's a Brand 😍🥰🥰😘😘😘😘😘😘❣️❣️❣️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
0
0

Select Language
Share Link
 
Search