Next
‘बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेविषयी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ गंभीर’
सुहास मर्चंट; वर्षभरात ७५० साइट अभियंत्यांना प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘कामाच्या ठिकाणी बांधकाम कामगारांची सुरक्षितता हा क्रेडाई पुणे मेट्रोसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बांधकामा ठिकाणी सुरक्षिततेसाठीची खबरदारी कसोशीने घेतली जावी यासाठी संघटना पूर्वीपासूनच साइट अभियंते व कंत्राटदारांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देत आहे. गेल्या वर्षभरात ७५० साइट अभियंत्यांना क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे प्रशिक्षित करण्यात आले असून, यापुढे या मोहिमेस आणखी गती देण्यात येईल,’ अशी माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली.

बांधकाम साइटच्या परिसरात अपघात होऊन मजुरांचा मृत्यू झाल्याच्या नुकत्याच घटलेल्या घटनेच्या अनुषंगाने मर्चंट यांनी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ची भूमिका स्पष्ट केली. या घटनेची चौकशी होणे गरजेचे असून, आम्ही आमच्या सदस्यांकडून त्यांच्या बांधकाम साइटवरील सुरक्षिततेच्या उपायांविषयी माहिती मिळवणे सुरू केल्याचे मर्चंट यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखणे हा बांधकाम व्यावसायिकांची संघटना म्हणून क्रेडाई पुणे मेट्रोसाठी गंभीर मुद्दा आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या साह्याने आम्ही बांधकाम कंत्राटदार, साइट अभियंते व कामगारांसाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. क्रेडाईच्या सदस्यांनीही त्यांच्या साईटवरील कंत्राटदार व अभियंत्यांना प्रशिक्षित करावे, तसेच साइटचे सेफ्टी ऑडिट करावे याविषयी सातत्याने जागृती केली जाते. आम्ही याविषयीची ‘सेफ्टी मॅन्युअल’देखील प्रकाशित केली असून, ती सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवली आहेत.’

‘सीक्यूआरए प्रा. लि. व विनिंग एज सोल्यूशन्स या सुरक्षितता विषयातील तज्ज्ञ संस्था ‘क्रेडाई’शी जोडलेल्या आहेत. बांधकामात वापरली जाणारी यंत्रे व इतर तंत्रज्ञान, रसायने आणि इलेक्ट्रिकल वस्तू हाताळताना घेण्याची खबरदारी याविषयी ऑडिट करणे व सुधारणा सुचवणे हे त्यांचे प्रमुख काम असून, सुरक्षिततेच्या उपायांविषयी योग्य तऱ्हेने नोंदी कशा ठेवल्या जाव्यात याविषयीही या संस्था मार्गदर्शन करतात,’ अशी माहितीही मर्चंट यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search