Next
गोखले कन्स्ट्रक्शन्सतर्फे यंदाही नवरात्रात घरखरेदीची सुवर्णसंधी
प्रेस रिलीज
Tuesday, October 09, 2018 | 03:36 PM
15 0 0
Share this story

विशाल गोखलेपुणे : दर्जेदार निवासी गृहप्रकल्पांची निर्मिती व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे या वर्षीही नवरात्राच्या पावन पर्वात घरखरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या विषयी अधिक माहिती देताना ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, ‘नवरात्राच्या नऊ दिवसांत नऊ नवीन गृहप्रकल्प सादर करण्याचा उपक्रम आम्ही गेली पाच वर्षे राबवीत आहोत. यंदा सहाव्या वर्षी देखील हीच परंपरा कायम राखत आम्ही पुणे शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी नऊ नवे गृहप्रकल्प सादर करीत आहोत, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

‘या वर्षी शहरातील आयडियल कॉलनी, कर्वेनगर, सहकारनगर, मयूर कॉलनी, कोथरूड (बेडेकर गणपती जवळ), सुभाषनगर, औंध, बावधन आणि प्रभात रस्ता या ठिकाणी साकारणारे आमचे प्रकल्प आम्ही ग्राहकांसाठी सादर करीत आहोत. या प्रकल्पांमध्ये दोन, तीन  आणि चार बीएचकेच्या सदनिका उपलब्ध होणार असून, त्यांची किंमत ही रुपये ८१ लाखांपासून ते रुपये सात कोटीपर्यंत असणार आहे’, अशी माहितीही विशाल गोखले यांनी दिली. हे सर्व गृहप्रकल्प महारेरा नोंदणीकृत आहेत.     

‘याशिवाय गेली काही वर्षे ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’च्या वतीने नवरात्राच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ नवीन गृहप्रकल्प सादर करण्याबरोबरच नऊ पूर्ण झालेल्या गृहप्रकल्पांचा ताबा देखील देण्यात येत आहे. या वर्षीही अशाच प्रकारे पूर्ण झालेल्या नऊ गृहप्रकल्पांचा ताबा या कालावधीत ग्राहकांना देण्यात येणार आहे’, असे गोखले यांनी आवर्जून नमूद केले. 

‘ज्या ग्राहकांना या संधीचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी ‘गोखले कन्स्ट्रक्शन्स’च्या प्रभात रस्त्यावरील (इन्कम टॅक्स ऑफिसजवळ) कार्यालयाला नवरात्रीच्या काळात भेट द्यावी’, असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link