Next
‘चांदणी चौकाचे काम आठवडाभरात सुरू होणार’
प्रेस रिलीज
Wednesday, December 26, 2018 | 05:39 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपूलाचे काम आठवडाभरात सुरू करण्याचे आदेश हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पालकमंत्री या नात्याने नवी दिल्ली येथे सतत पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला मान्यता दिली. त्यामुळे चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नियोजित वेळेत हे काम पूर्ण होईल व तेथील वाहतूक कोंडी संपुष्टात येईल.’

‘हैदराबाद येथील एनसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तशी वर्क ऑर्डर भारतीय राजमार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात ३९७ कोटींची कामे पूर्ण कराकरावीत, असे आदेश एनसीसी कंपनीला देण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर येत्या आठवडाभरात हे काम सुरू होईल. चांदणी चौकाचे हे काम एकूण ४९५ कोटी रूपयांचे आहे. त्यासाठी लागणारे भूसंपादन महापालिकेने करायचे आहे. महापालिकेने एकूण ८५ टक्के भूसंपादन या पूर्वीच केले आहे. उरलेल्या १५ टक्के भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय केंद्रीय महामार्ग खाते काम सुरू करण्यास तयार नव्हते. पालकमंत्री या नात्याने गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला,’ असे बापट यांनी सांगितले.

मुंबई-पुणे-हिंजवडी आयटी पार्क-बंगलोर हायवे या रस्यावरील वाहतूक अधिक गतिमान होण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल. पुणेकरांना दिलेल्या आणखी वचनांची पूर्तता होत आहे, याचा भारतीय जनता पक्षाला अभिमान वाटत असल्याचे बापट यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search