Next
जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतीपदी वैशाली चंदे बिनविरोध
BOI
Wednesday, July 10, 2019 | 01:49 PM
15 0 0
Share this article:

नवनिर्वाचित सभापती वैशाली चंदे यांना शुभेच्छा देताना जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा जाधवपडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा विभागातील बोरीवली जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या वैशाली विष्णू चंदे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. 

ठाणे जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या विविध समितीच्या सभापतींनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार आठ जुलैला ठाणे येथे झालेल्या सभापती निवडणुकीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण जिल्हाप्रमुख व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नाने वैशाली चंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची निवड होताच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जल्लोष करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

चंदे यांनी निवड झाल्यानंतर जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व त्यांच्या मातोश्रींचे पडघा येथील कार्यालयात जाऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी आमदार शांताराम मोरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कांदळी ग्रामपंचायतीच्या सरपंच व शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असणाऱ्या चंदे यांची सभापतीपदी निवड होताच शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकासंह पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कांदळी येथील कार्यालयात गर्दी केली होती. १९७२ नंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीवर पहिल्यांदाच एक महिलेची सभापतीपदी वर्णी लागल्याने चंदे यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search