Next
व्होडाफोनची डिजिटल परिवर्तनाला चालना
प्रेस रिलीज
Wednesday, March 28 | 04:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई :  ‘ग्राहक सेवा हा गाभा असलेली व्होडाफोन इंडिया आपल्या २१ कोटींहून अधिक ग्राहकांना नव्या डिजिटल युगाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. आता नव्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांद्वारे व्होडाफोनने झूझूंना नव्या निन्जा अवतारात आणले असून, ‘हॅपी टू हेल्प इन ए क्लिक’ तत्त्वज्ञान व्होडाफोन रुजवत आहे’, अशी माहिती  व्होडाफोन इंडियाच्या विपणन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सिद्धार्थ बॅनर्जी यांनी दिली.
 
ते पुढे म्हणाले, ‘ग्राहक सेवा ही दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची सेवा आहे, ही बाब व्होडाफोनने नेहमीच कटाक्षाने पाळली आहे. दूरसंचार उद्योगात ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणारी कंपनी म्हणून व्होडाफोनची ख्याती आहे. संपूर्ण जग डिजिटलकडे वाटचाल करत असताना, विविध प्रकारांतील ग्राहक सेवांचे रूपांतर हे कर्मचाऱ्यांतर्फे चालविल्या जाणाऱ्या कॉल सेंटर आधारित तक्रार निवारण सेवांकडून डिजिटल स्वरूपाच्या, स्वयंपूर्ण आणि अहोरात्र चालणाऱ्या सेवांमध्ये झाले आहे. व्होडाफोन या उत्क्रांतीचे नेतृत्व करीत असून, ग्राहकांचे बोट धरून त्यांना केवळ साह्यकारी सेवांकडून अहोरात्र उपलब्ध असलेल्या डिजिटल स्वयंसेवांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.’

‘वेग आणि कार्यक्षमता हाच सेवांचा गाभा मानून व्होडाफोन ग्राहकांना सर्व माध्यमांत अधिकाधिक सोय उपलब्ध करून देण्यावर भर देते. उदाहरणार्थ, ग्राहकांना आता त्यांच्या योजना आणि फोन क्रमांक ऑनलाइन बदलता येऊ शकतात आणि नवे कनेक्शन घरबसल्या मिळू शकते. ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची फोन खाती ‘माय व्होडाफोन अॅप’वर ऑनलाइन हाताळता येऊ शकतात आणि स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी भेटीचे पूर्वनियोजन करता येते’, असे ही बॅनर्जी यांनी सांगितले.
 
‘तंत्रज्ञानाच्या रेट्यामुळे ग्राहकांचे वर्तन आणि अपेक्षा बदलत असल्यामुळे व्होडाफोननेही आपल्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. आमच्या विषयानुरूप मोहिमेस अनुसरून लोकप्रिय झूझू आम्ही नव्याकोऱ्या निन्जा अवतारात आणत आहोत. दर वर्षीप्रमाणे व्होडाफोनची झूझू जाहिरात मोहीम यंदाही राबविली जाणार आहे’, असे ही बॅनर्जी यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link