Next
राज्य अजिंक्यपद सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, May 10 | 04:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटना व आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या ज्युनियर गट शारदा-गजानन चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आझम कँपस येथे १२ ते १४ मे दरम्यान करण्यात आले आहे,’ अशी माहिती पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गजानन पंडित यांनी दिली.

या वेळी पुणे जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे शहर, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड, मुंबई, जळगांव, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, सांगली, लातूर, बीड, औरंगाबाद असे २५ संघ सहभागी होत आहेत. सुमारे ४५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विजेत्या, उपविजेत्या व तिसऱ्या क्रमांक मिळविणाऱ्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरीने बेस्ट बॅटर, बेस्ट पीचर व बेस्ट कॅचर अशी तीन वैयक्तिक बक्षीसे देखील देण्यात येणार आहेत.   

‘स्पर्धेचे उदघाटन १२ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक, एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती थोरात यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link