Next
सनसिटी ते कर्वेनगर पुलाच्या कामासाठी हिरवा कंदील
नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नांना यश
प्रेस रिलीज
Friday, January 25, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:

मंजुषा नागपुरेपुणे : सिंहगड रस्ता परिसर व कर्वेनगरला जोडणारा आणखी एक पूल लवकरच उभारण्यात येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या कामाला अखेर पुणे महापालिकेच्या २३ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या मुख्य सभेत मान्यता मिळाली. सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या मुठा नदीवरील पुलाचे काम आता लवकरच सुरू होईल. या कामाची पहिली पायरी म्हणून पुलाच्या आजुबाजूच्या परिसरातील भुसंपादन करण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. अनेक वर्षांपासून नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केलेल्या प्रयत्नांना या निर्णयामुळे यश आले आहे.

या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी भूसंपादनाचे काम केले जाईल. कर्वेनगर, हिंगणे बुद्रुक बाजूकडील अंदाजे दोन हजार चौरस मीटर व सिंहगड रोड बाजूकडील अंदाजे १० हजार चौरस मीटर इतक्या जागेच्या भूसंपादनास मान्यता देण्यात आलेली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच पुलाचे मुख्य काम सुरू केले जाईल.

या विषयी बोलताना नागपुरे म्हणाल्या, ‘जनसामान्यांच्या हितार्थ असणाऱ्या विकासकामांना मी नेहमीच प्राधान्य दिला आहे. कर्वेनगर व सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या या पुलाला मान्यता मिळावी यासाठी मी बऱ्याच कालावधीपासून प्रयत्नशील होते. अखेर माझ्या प्रयत्नांना यश आल्याने मला समाधान मिळाले. सिंहगड रस्ता व कर्वेनगर परिसरातील रहिवाशांना या पुलाचा नक्कीच उपयोग होईल; तसेच यामुळे राजाराम पुलावर मोक्याच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यासदेखील मदत होईल, असा मला विश्वास आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pradip borkar About 197 Days ago
Very nice
0
0
दिलीप कुलकरणी Hassy club A Nagar Aanand Maruti Mandir About 205 Days ago
You are doing so much good work last two three years your contribution for improvement of Anand nagar and sarroundig area is appropriciable Thanks to you & your other corporateres .you are requested to look in to Anand Maruti mandir areas development Hoping best future for you
0
0

Select Language
Share Link
 
Search