Next
प्रसिद्ध व्यक्ती आणि चाहत्यांना जोडणारे ‘फॅनकाइंड’
समाजकार्यासाठी निधी उभारण्याचा अभिनव उपक्रम
BOI
Thursday, August 01, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : प्रसिद्ध कलाकार, उद्योजक, चाहते आणि धर्मादाय संस्थांना एकत्र आणणारे ‘फॅनकाइंड’ हे ऑनलाइन व्यासपीठ अंशुला कपूर यांनी दाखल केले आहे. याद्वारे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांसह वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, आणि समाजसेवी संस्थांसाठी निधीही उभा केला जाईल. सेलिब्रिटींसोबत चाहत्यांना पेंटबॉल ते क्रिकेट खेळण्यापासून बेकिंग, कुकींगपर्यंत विविध उपक्रमांचा अनुभव घेता येईल. 

अंशुला कपूर
यासाठी चाहत्यांनी फक्त ३०० रुपये द्यायचे असून, यातील मोठा हिस्सा धर्मादाय संस्थेना देणगी म्हणून देण्यात येणार आहे. वरुण धवन, आलिया भट्ट, यूट्यूब सेन्सेशन प्राजक्ता कोळी (मोस्टली सेन), सोनाक्षी सिन्हा असे अनेक कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत. 

या नवीन उपक्रमाबाबत अंशुला कपूर म्हणाल्या, ‘देशभरातील अनेक धर्मादाय संस्थांसाठी पैसे उभे करताना चाहत्यांना त्यांच्या जीवनातील एक उत्तम अनुभव देऊन त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणणे हे ‘फॅनकाइंड’चे उद्दिष्ट असून, सध्या, पहिल्या वर्षात ३० हून अधिक धर्मादाय संस्थांसोबत काम करण्याची अपेक्षा आहे. या कामात ‘गिव्ह इंडिया’ सहकार्य करणार असून, चाहत्यांना कर लाभ प्रमाणपत्र (८० जी) देण्याची जबाबदारीही ‘गिव्ह इंडिया’ची असेल.’

या उपक्रमाबाबत बोलताना, ‘गिव्ह इंडिया’च्या विपणन आणि सहयोग प्रमुख प्रियांका प्रकाश म्हणाल्या, ‘लोकांना समाजासाठी काहीतरी करायचे असते; पण त्यांना हे कसे करावे, हे माहित नसते. ‘फॅनकाइंड’च्या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search