Next
‘नकळत सारे घडले’च्या प्रिन्स दादाचे यू-ट्यूब चॅनेल हिट
प्रेस रिलीज
Monday, June 04, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मालिकेच्या सेटवर धावपळ, शूटिंग सुरू असले, तरी काही कलाकार आपल्या छंदांना, आवडींनाही प्राधान्य देतात. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील प्रिन्स दादाने आपली गाण्याची आवड जपण्यासाठी यू-ट्यूबवर चॅनेल सुरू केले असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.


‘नकळत सारे घडले’मध्ये प्रिन्सची भूमिका करणारा आशिष गाडे स्वतः उत्तम वादक आणि गायक आहे. तो गिटार, सिंथेसायजर अशी वाद्य वाजवतो. प्रतापची भूमिका करणारा हरीश दुधाडेही उत्तम गायक आहे. या दोघांची मालिकेच्या ऑडिशनवेळी भेट झाली. गप्पांमध्ये दोघांना एकमेकांच्या संगीताच्या आवडीविषयी समजले. मालिकेचे शूटिंग सुरू झाल्यावर काही दिवसांनी हरीश आशिषकडून गिटार वाजवायलाही शिकला. त्यानंतर एकदा गंमत म्हणून मेकअप रूममध्ये दोघांनी गिटार वाजवत गाणे गायले आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिथे त्याचे खूप कौतुक झाले. त्यामुळे आशिषने ‘ashish gade entertainment’ युट्यूब चॅनेल सुरू करून नियमितपणे व्हिडिओ शेअर करायचे ठरवले. मालिकेत संजयची भूमिका साकारणारा सुप्रीत कदमही त्यांच्यात सामील झाला. त्या तिघांनी अनेक सुपरहिट गाण्यांचे एक फ्युजन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आशिष आणि हरीशच्या गाण्यांमुळे सेटवरचे वातावरणही संगीतमय होऊन जाते. या युट्यूब चॅनेललला दोन हजार सबस्क्रायबर्सही मिळाले आहेत.

‘मालिकेच्या सेटवर फावल्या वेळात बाकी काही करण्यापेक्षा आम्ही गाणी गाऊन छान एन्जॉय करतो. सेटवरची बाकीची मंडळी आणि कलाकारही सहभागी होतात. जिथे संगीत असते, तिथे खूप सकारात्मक उर्जा असते, असे मला वाटते. त्यामुळे एक गंमत म्हणून आम्ही गाणे सुरू केले होते. आता त्याला अधिक चांगल्या पद्धतीने सादर करणार आहोत,’ असे हरीशने सांगितले.

‘नकळत सारे घडले’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर दाखवली जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link