Next
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ
BOI
Thursday, August 02 | 09:45 AM
15 0 0
Share this story

मराठेशाहीच्या इतिहासातील सोनेरी पाने आपल्यासमोर येत असतात. त्या पानांमधून त्या वेळच्या थोर पुरुषांविषयीची माहितीही समजते; परंतु काहीजण मात्र उपेक्षित राहिले. अठराव्या शतकातील एक उपेक्षित इतिहासपुरुष म्हणजे सदाशिवरावभाऊ. ते चिमाजीअप्पांचे पुत्र. ‘पानिपत हरण्यास कारणीभूत’ असे सदाशिवरावभाऊंविषयी बोले जाते; मात्र, कौस्तुभ कस्तुरे यांनी सदाशिवभाऊंच्या लिहिलेल्या या चरित्रातून अनेक अप्रकाशित गोष्टी समोर येतात.

भाऊंनी त्यांच्या केवळ १५ वर्षांच्या कारभारात मोठी कामगिरी केली, असे या चरित्रातून स्पष्ट होते. सावनूरच्या स्वारीपासून पानिपतपर्यंत आणि त्यानंतरचे तोतया प्रकरण यांतून ही कामगिरी वाचकांपर्यंत पोहोचते. पुस्तकातील परिशिष्टामध्ये भाऊसाहेबांनी मांडलेला खर्चाचा आणि वसुलाचा ताळेबंद दिला आहे. दुसऱ्या परिशिष्टात नानासाहेब, भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या सन १७५० ते सन १७६१ पर्यंतच्या हालचालींचा तक्ता दिला आहे.   

प्रकाशक :
राफ्टर पब्लिकेशन्स
पाने : २१४
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link