Next
‘व्हॅस्कॉन’चा परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश
प्रेस रिलीज
Friday, May 11, 2018 | 01:59 PM
15 0 0
Share this story

‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’ निवासी प्रकल्पाची घोषणा करताना व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे अध्यक्ष आर. वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन, रिअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश म्हात्रे, व्हॅस्कॉन समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संत

पुणे : व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. या अत्यंत विश्वासार्ह व पुण्यात मुख्यालय असलेल्या विकसक कंपनीने परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून, पहिला प्रकल्प तळेगावजवळ काटवी येथे उभारण्याची घोषणा केली आहे. ‘कंपनीतर्फे ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’ हा प्रकल्प तळेगावजवळ काटवी येथे साकारण्यात येत असून, येथे वनरुम किचन, एक बीएचके व दोन बीएचके फ्लॅट्स परवडणाऱ्या दरात  उपलब्ध होणार आहेत’, अशी माहिती व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. चे अध्यक्ष आर. वासुदेवन यांनी दिली. 

या वेळी व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन, कंपनीच्या रिअल इस्टेट विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश म्हात्रे, व्हॅस्कॉन समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष सुंदरराजन उपस्थित होते. 

आर. वासुदेवन पुढे म्हणाले,‘या प्रकल्पात वन रूम किचनचे घर साधारण १३ लाख रुपयांत उपलब्ध होणार असून, ही किंमत सर्वसमावेशक आहे. परवडणारी घरे म्हणजे छोटी, कमी सुविधा असलेली घरे अशी संकल्पना न ठेवता उच्च दर्जाच्या आणि ही घरे घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहक वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार, ‘गुडलाईफ’मध्ये विविध सोयी-सुविधा असून, त्यांत सर्व वयोगटांचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येक टॉवरमध्ये ग्रंथालय, अभ्यासासाठी वाचनालय, संगणकांची उपलब्धता असलेले विशेष कक्ष बांधण्यात आहेत.’
 
‘दहा एकर जागेवर हा प्रकल्प साकारला जाणार असून, तीन टप्प्यात त्याची उभारणी होईल. पहिल्या टप्प्यात सहा व अकरा मजली इमारतींमध्ये पाचशे घरे उपलब्ध केली जातील. तीन टप्प्यात एकूण एका हजार १४४ घरे देण्यात येतील. या प्रकल्पात दुकानेही उपलब्ध करण्यात येणार आहेत. जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रूतगती महामार्गापासून तसेच; आयटी कंपन्या आणि विविध उद्योग यांच्या जवळच हा प्रकल्प आहे. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय प्रकल्पाच्या आवारातच करण्यात येणार असून, यामुळे ‘व्हॅस्कॉन’ने एक नवीन पायंडा पाडला आहे,’ असेही वासुदेवन यांनी नमूद केले. 

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक सिध्दार्थ वासुदेवन म्हणाले, ‘गेल्या काही काळापासून परवडणाऱ्या घरांना मोठी मागणी येऊ लागली आहे. शहरांकडे होणारे स्थलांतर आणि सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती यांचा विचार करून गृहनिर्माण प्रकल्प उभे राहात आहेत. कौटुंबिक दृष्टीने मुलांचे संगोपन, शिक्षण व विकास यांना महत्त्व देणारा हा पहिलाच गृहनिर्माण प्रकल्प आम्ही ‘व्हॅस्कॉन गुडलाईफ’च्या रुपाने उभारला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आमचे विशेष कौशल्य यांचा उपयोग करून घरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी मिळेल, याचा आम्ही या प्रकल्पात विचार केला आहे. ‘व्हॅस्कॉन’ला तीन दशकांची गौरवशाली परंपरा आहे. उत्कृष्ट दर्जा व पैशाचा पुरेपूर मोबदला या आमच्या तत्वांना आम्ही जपतो. यापुढेही आम्ही नवनवीन संकल्पांचा विचार करू व तसे प्रकल्प राबवू.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link