Next
‘रक्ताचे नाते ट्रस्ट’तर्फे २० शहरांत रक्तदान शिबिरे
प्रेस रिलीज
Wednesday, May 08, 2019 | 12:31 PM
15 0 0
Share this article:

रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टतर्फें पुण्यात एक मे रोजी झालेल्या रक्तदान शिबिराला उपस्थित काँग्रेसचे मोहन जाशी, ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड आदी.

पुणे : येथील रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक ते १० मे २०१९ या कालावधीत यंदा पुण्यासह महाराष्ट्रातील २० शहरांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. यात न्यासाचे अध्यक्ष राम बांगड यांचे चिरंजीव महेश आणि कन्या स्नेहल यांनी स्वयंसेवक म्हणून सक्रीय पुढाकार घेतला आहे.

सोलापूर, लातूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, नवी मुंबई, लोणावळा, सातारा, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर आणि पुणे या शहरांत ही शिबिरे घेतली जाणार असून, त्याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी पुण्यातील मुरलीधर मंदिर येथे आयोजित शिबिरापासून करण्यात आला. काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्या उपस्थितीत ३०३ दात्यांनी रक्तदान केले. या मोहिमेच्या निमित्ताने बांगड यांनी स्वत: रक्तदान केले असून ते त्यांचे १२८वे रक्तदान ठरले आहे.

या विषयी बोलताना बांगड म्हणाले, ‘दर वर्षी उन्हाळा जसजसा वाढत जातो, तसतसे पाण्याप्रमाणे रक्ताची कमतरताही जाणवू लागते. रुग्णांना लागणार्‍या रक्ताची गरज पुरवता येत नाही, कारण एप्रिल, मे आणि जून या महिन्यात देशभरात स्वेच्छेने रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांच्या संख्येतही सुमारे ७० टक्के घट होते, असा आजवरचा अनुभव आहे. यावर अनेक सामाजिक संस्था, रक्तपेढ्या आणि रुग्णालये प्रयत्न करत असूनही पुरेसे रक्त मिळू शकत नाही.’

पुण्यात व महाराष्ट्रात सक्रीय असणार्‍या रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून, ट्रस्टकडे ५० हजार रक्तदात्यांच्या नाव व पत्त्यांचा वापर या मोहिमेसाठी केला जाणार आहे. ट्रस्टतर्फे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात काश्मिरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या मोहिमेत बांगड यांचे चिरंजीव महेश यांनी त्यांचे ३२वे रक्तदान केले असून, कन्या स्नेहल हिने २०वे रक्तदान आहे. 

‘रक्तदान हे महान कार्य असल्याने या मोहिमेसाठी महाराष्ट्रातील २० प्रातिनिधिक शहरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सलग दहा दिवसांच्या या प्रवास मोहिमेत आम्ही स्वैच्छिक रक्तदाते, डॉक्टर, रक्तपेढी मालक व व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्धीमाध्यमे आदींशी संपर्क साधत आहोत,’ असे बांगड यांनी सांगितले. 

अधिक माहितीसाठी संपर्क : महेश बांगड- ९९७५७ ०९६६५ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search