Next
सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे सफाई कामगारांचा सत्कार
BOI
Tuesday, February 05, 2019 | 05:58 PM
15 0 0
Share this story

स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक चौदाचे आरोग्य निरीक्षक व २०० सफाई कामगारांचा नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुणे : पुणे महापालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग क्रमांक चौदाला नुकतेच प्रथम स्थान मिळाले. या कामामध्ये प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. या निमित्ताने व या प्रभागाचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या प्रभागाचे आरोग्य निरीक्षक व तब्बल २०० सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रभागाचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी या वेळी या सर्वांना भेटवस्तू देत त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कामामध्ये मोठा सहभाग असलेले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय. एस. इनामदार यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. 

या वेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘पुणे महानगर पालिकेच्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या मुल्यांकनामध्ये बसण्यासाठी वेगवेगळे १३ निकष पार करावे लागतात. यामध्ये मुख्यत: कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, झोपडपट्टयांमध्ये स्वच्छता करणे, रस्ते झाडणे, सार्वजनिक स्वच्छतालये आणि त्यांची योग्य देखभाल या सर्वांचाच समावेश होतो. या सर्वांमध्ये आपल्या प्रभागातील आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी प्रभागातील नागरिक आणि आम्ही त्यांच्या या सेवेप्रती यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link