Next
‘नादरूप’च्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, August 28, 2018 | 12:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘प्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या ‘नादरूप’ या कथक संस्थेच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या शनिवारी, दि. एक सप्टेंबर रोजी पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात सायंकाळी सहा वाजता ‘इकोज ऑफ दी इनर व्हॉईस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येईल’, अशी माहिती कथक गुरु शमा भाटे यांनी दिली. या वेळी केदार पंडित आणि स्वप्नील कुमावत हे देखील उपस्थित होते.

प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या शिष्या शमा भाटे यांची नादरूप ही कथक संस्था या वर्षी ३१ वर्षे पूर्ण करीत आहे. ‘नादरूप’ ही पुण्यातील कथक नृत्य शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था असून, नाविन्यपूर्ण रचनांनी कथक नृत्याला नविन आयाम देण्याचा नादरूप आणि संचालिका गुरू पं. शमा भाटे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. 

या वेळी बोलताना भाटे म्हणाल्या, ‘नादरूप आपल्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या परंपरेला साजेशी नविन कलाकृती घेऊन लोकांपुढे येत आहे. कथक नृत्य हे त्याच्या अभिनयातील संयमितता आणि नैसर्गिकता यामुळे लोकांना कायम वास्तविकतेच्या जवळचे वाटते. याच वैशिष्ट्यपूर्णतेला विविध तांत्रिक माध्यमांची (multi media) जोड असे आमच्या यावर्षीच्या प्रस्तुतीचे स्वरूप असणार आहे. नृत्त व नृत्य या दोन्ही विधांद्वारे कथक शैलीचे जाणवणारे वेगळेपण हे निश्चितच या प्रस्तुतीचे वैशिष्ट्य ठरेल, असा आमचा विश्वास आहे.’

‘गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या ‘चतुरंग की चौपाल’ या प्रस्तुतिद्वारे चौपालच्या पटाबरोबर रंगमंचीय  अवकाशतील अमर्याद शक्यतांना कथकमधील पारंपरिक नृत्यची जोड देण्यात आली होती. तर या वर्षी नृत्याभिनयातील शक्यतांना पाच वेगवेगळ्या कथांमधून अधोरेखीत केले जाणार आहे. या कथांना एका सूत्रात बांधण्याचे काम तांत्रिक माध्यमातून (multi media) आजी व नातीच्या संवादातून मांडले जाणार आहे. आजीची मानसशास्त्रीय मनोभूमिक आणि अवखळ नातीचे वैचारिक आदानप्रदान ही या प्रस्तुतीला एक नवा आयाम देईल. दोन पिढ्यांचे विचार, त्यांच्यातील तात्विक मतभेद, भावनांच्या पातळ्या हा कायमच समाजातील एक जाज्वल्य विषय आहे तोच या प्रस्तुतिद्वारे मांडला जाणार आहे. बदलत्या काळाबरोबर माणसाची पर्यायाने समाजाची समज बदलत राहते. तरीही समाजातील आणि समाजमनातील मूळ वृत्ती-प्रवृत्ती, विवेक, अनाचार, आध्यात्मिक शोध हे नेहमीच शाश्वत राहतात हेच मांडण्याचा प्रयत्न या सदरीकरणामधून आम्ही करीत आहोत’, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात दिल्लीचे धीरेंद्र तिवारी, विश्वदीप शर्मा, कलकत्ता येथील सौविक चक्रवर्ती, तर पुण्याच्या अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, भार्गवी सरदेसाई, इशा ननाल, कृपा तेंडूलकर, निकिता कारळे आदी प्रमुख नृत्यांगना सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही कथक गुरु शमा भाटे यांची असून, केदार पंडित यांनी कार्यक्रमाला संगीत दिले आहे. याबरोबरच स्वप्नील कुमावत (फिल्म), हर्षवर्धन पाठक (प्रकाशयोजना), नितीन जोशी (साउंड), एम. बी. नागराज, शीतल ओक (नेपथ्य), कुंदन रुईकर (पोस्टर डिझाईन), अशोक सोनावणे (स्टेज), नीरजा आपटे (निवेदन) यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमाला लाभले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search