Next
खासदार चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रेस रिलीज
Thursday, March 08 | 04:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेसाठी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी आठ मार्च २०१८ रोजी विधानभवनामध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

गेल्या आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर हा अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेमधील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार दीप्ती चव्हाण, आमदार सुमन पाटील, आमदार संध्या कुपेकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार विक्रम काळे, आमदार ख्वाजा बेग, आमदार संजय कदम, आमदार राहुल जगताप, आमदार दत्ता भरणे, आमदार सुरेश लाड आदी उपस्थित होते.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार चव्हाण यांच्यासमवेत विधानभवन परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, ऋचा शिंदे, पुणे युवती अध्यक्षा मनाली भिलारे आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link