Next
अलविदा २०१७ - भाग ५
BOI
Sunday, December 31 | 12:45 PM
15 0 0
Share this story


२०१७ या वर्षात देशभरात काही विक्रम घडले. अर्थविषयक अनेक घडामोडीही घडल्या. तसेच राज्यासह देश-विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींचे निधनही वर्षभरात झाले. यातील निवडक घटनांची ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने केलेली ही नोंद...

.............
काही विक्रम :

२१ जानेवारी : गुजरातमध्ये राष्ट्रगीत गायनाचा जागतिक विक्रम. राजकोट जिल्ह्यातील कागवाड इथे साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रगीतगायन केले.

१० फेब्रुवारी :
प्रख्यात वाळुशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथील समुद्रकिनारी सर्वाधिक उंचीचा वाळूचा किल्ला रचून विश्वविक्रम केला.

१८ नोव्हेंबर : १९१६-१७ मध्ये यशवंत पाध्ये यांनी इंग्लंडहून एका दुकानातून बाहुला आणून ‘अर्धवटराव’ नावाने त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र रामदास पाध्ये यांनी तोच बहुला वापरून प्रयोग सुरू ठेवले. या बोलक्या बाहुल्याने शंभरी गाठली, हा एक आगळा विक्रमच!
.......
अर्थविषयक घडामोडी

५ मार्च :
देशातील बेरोजगारीत घट झाल्याची एसबीआय इकोफ्लेश अहवालात नोंद. बेरोजगारीचा दर ऑगस्ट २०१६ मधील ९.५ टक्क्यांवरून फेब्रुवारी २०१७मध्ये ४.८ टक्के झाला.

६ मार्च : ‘सेन्सेक्स’चा दोन वर्षांचा उच्चांक. २९ हजारांचा टप्पा सर.

७ मार्च : देशातील म्युच्युअल फंडांची मालमत्ता विक्रमी टप्प्यावर. १७.८९ लाख कोटी रुपये मालमत्तेची नोंद.

१८ मार्च : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे  काटकसरीला प्राधान्य. रस्ते, शहरी वाहतूक, कृषी, ग्रामविकास या क्षेत्रांकडे विशेष लक्ष.

२० मार्च : आयडिया आणि व्होडाफोन कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी. मोबाइल महाकंपनीचा उदय.

२१ मार्च : ‘डी मार्ट’च्या समभागाची शेअर बाजारात दुप्पट भावाला नोंदणी. २९९ रुपये किंमतीचा समभाग नोंदणी होताना ६०४ रुपयांवर.

६ जून : भारताच्या विकासाचा दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज. जागतिक बँकेच्या अहवालात आशावाद व्यक्त.

९ डिसेंबर : वर्षभरात सेन्सेक्स सुमारे सात हजार, तर निफ्टी दोन हजार अंकांनी वाढला. ८ डिसेंबर २०१६ (शुक्रवार) रोजी सेन्सेक्स २६ हजार ७४७, तर निफ्टी आठ हजार २६१ एवढा होता. ९ डिसेंबर २०१७ (शुक्रवार) रोजी सेन्सेक्स ३३ हजार २५०, तर निफ्टी  १० हजार २६५एवढा नोंदवला गेला.

२६ डिसेंबर : २०१७ या वर्षभरात म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत सहा लाख कोटी रुपयांची वाढ होऊन ती २३ लाख कोटींवर पोहोचल्याचे जाहीर.
.....
निरोप

६ जानेवारी :
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी

२२ जानेवारी : हिंदी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ गीतकार, शायर नक्श लायलपुरी तथा जसवंतराय शर्मा 

१८ फेब्रुवारी : स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक जांबुवंतराव धोटे

१९ फेब्रुवारी : माजी सरन्यायाधीश अल्तमश कबीर

२८ फेब्रुवारी : ज्येष्ठ साहित्यिक व सत्यशोधक विचारवंत प्राचार्य गजमल माळी

१ मार्च :
‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे लेखक तारक मेहता

७ मार्च : समाजशास्त्रज्ञ डॉ. द. ना.धनागरे

९ मार्च : ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे

२१ मार्च : अमेरिकेतील उद्योजक डेव्हिड रॉकफेलर (१०१)

२२ मार्च : ज्येष्ठ पत्रकार, लेखक गोविंद तळवलकर

२ एप्रिल : कथालेखक, निर्माते अजेय झणकर

३ एप्रिल : गानसरस्वती किशोरी आमोणकर

१३ एप्रिल : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. दांडेकर

१३ एप्रिल : इंटरनेटच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावणारे रॉबर्ट टेलर

१५ एप्रिल : जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती (११७ वर्षे) एम्मा मार्टिना ल्युईगिया मोरानो (इटली)

२० एप्रिल : साहित्यिक प्रा. रामनाथ चव्हाण

२७ एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना

७ मे : प्रख्यात सतारवादक उस्ताद रईस खाँ

९ मे : मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मेहरुन्निसा दलवाई

१२ मे : क्रीडा अध्वर्यू भीष्मराज बाम

१६ मे : पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे

१८ मे : ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू

१८ मे : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे

२३ मे : जेम्स बाँड अजरामर करणारे सर रॉजर मूर

२६ मे : आयपीएस अधिकारी के. पी. एस. गिल

१६ जून :  माजी सरन्यायाधीश पी. एन. भगवती

२ जुलै : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते मधुकर तोरडमल

११ जुलै : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

१९ जुलै : प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे

२४ जुलै : ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष प्रा. यू. आर. राव

२ सप्टेंबर : ‘हायकू’कर्त्या आणि लेखिका शिरीष पै

१२ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार व छायाचित्रकार विठोबा पांचाळ

२ ऑक्टोबर : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे

७ ऑक्टोबर : चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व लेखक कुंदन शहा

२४ ऑक्टोबर : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजादेवी

२४ ऑक्टोबर : उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारिवाल

१४ नोव्हेंबर : प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा

२३ नोव्हेंबर : प्रसिद्ध पार्श्वगायिका मीना कपूर

४ डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर

१४ डिसेंबर : हिंदी सिनेमा कथाकार, अभिनेता, दिग्दर्शक नीरज व्होरा

१८ डिसेंबर  : पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे

२८ डिसेंबर :
ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ परशुराम यशवंत खडीवाले ऊर्फ वैद्य खडीवाले

(२०१७चा अन्य क्षेत्रांतील आढावा https://goo.gl/aLBXVz या लिंकवर वाचता येईल.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link