Next
‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा
प्रेस रिलीज
Saturday, May 12, 2018 | 11:51 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (जिओ) नव्या पोस्टपेड योजनेची घोषणा केली असून, भारतातील पोस्टपेड सेवेत नवे बदल आणण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले आहे. नवी जिओ पोस्टपेड सेवा सर्व ग्राहकांसाठी १५ मे २०१८पासून उपलब्ध होईल.

‘जिओ’ने प्रीपेड सेवेत घडविलेल्या बदलाप्रमाणे पोस्टपेड सेवा देण्याच्या आणि स्वीकारण्याच्या पद्धतीत अमूलाग्र बदल जिओ पोस्टपेड घडवणार आहे. सध्याचा मोबाईल क्रमांक न बदलता ग्राहकांना ‘जिओ’मध्ये सहभागी होता येणार असून, नव्या श्रेणीतील पोस्टपेडचा अनुभव घेता येणार आहे.

‘जिओ’ आता पोस्टपेड ग्राहकांच्या गरजांनुसार जिओ पोस्टपेडमध्ये चांगली सेवा देणार आहे. आतापर्यंत भारतातील पोस्टपेड ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत ‘झिरो-टच’ पोस्टपेडच्या माध्यमातून ‘जिओ’ क्रांतिकारी बदल घडविणार आहे. भारतात अतिशय कमी शुल्कात सेवा देऊन पोस्टपेड उद्योग क्षेत्रातील जैसे-थे वातावरणाला धक्का देण्यात येणार आहे. पोस्टपेड ग्राहकांना भारतासोबत जगभरातील कमी शुल्कात सेवा उपलब्ध होणार आहे. सर्वसाधारणपणे सेवेसाठी प्रिपेडपेक्षा अधिक पैसे पोस्टपेड ग्राहक मोजतात.

‘जिओ’ने सर्व ग्राहकांसाठी आकर्षक आंतरराष्ट्रीय कॉलिंग आणि रोमिंग शुल्काची घोषणा केली आहे. यामुळे बील वाढण्याची चिंता न करता ग्रहकांना संवाद साधता येईल.

‘जिओ पोस्टपेड’विषयी :
सर्व पोस्टपेड सेवा व्हॉईस, इंटरेनट, एसएमएस, इंटरनॅशनल कॉलिंग आधीच ऍक्‍टिव्ह केलेल्या असणार आहेत. कोणतेही जादा शुल्क, अवाजवी आणि अनपेक्षित बिलाचा धक्का नाही; तसेच दरमहा झिरो क्‍लिक बिलभरणा, प्रत्येक महिन्याच्या अखेरीस सर्व सेवांचा वापर ग्राहकांना इनबॉक्‍समध्ये तपासता येणार आहे. त्याचप्रमाणे चालू वापरही तपासता येणार आहे. जगभरात कोठेही गेलात, तरी सेवा बंद होणार नाही आणि भारत, तसेच जगभरात कमी शुल्क आकारणी केली जाईल.

दरमहा १९९ रुपये शुल्कात अमर्यादित भारत प्लॅन, इंटरनॅशनल कॉलिंग ५० पैसे प्रतिमिनिटपासून सुरू,  देशातील दराप्रमाणे आंतरराष्ट्रीय रोमिंग (व्हॉइससाठी प्रतिमिनिट दोन रुपये, डेटासाठी प्रतिएमबी दोन रुपये, प्रतिएसएमएस दोन रुपये) अथवा अमर्यादित सेवा दररोज पाचशे रुपये (अधिक कर), कोणत्याही सुरक्षा ठेवीशिवाय आंतरराष्ट्रीय कॉलिंग अॅक्‍टिव्ह, आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करण्यासाठी सुरक्षा ठेवीची गरज नाही, कॉलचा दर ५० पैसे प्रतिमिनिटपासून सुरू, आंतरराष्ट्रीय कॉलचा कमी दर ठेवण्यासाठी छुपे शुल्क अथवा सेवा शुल्क नाही ही ‘जिओ’च्या योजनेची वैशिष्ठ्ये आहेत.
 
एका क्‍लिकवर आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरू होणार असून, दरमहा शुल्क अथवा सुरक्षा ठेवीशिवाय आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवेचे मोफत अॅक्‍टिव्हेशन मिळणार आहे. छोट्या आणि मोठ्या ग्राहकांसाठी आकर्षक दर असून, जगराभत अमर्यादित डेटा आणि व्हॉइस पॅक्‍स मिळतील. ‘जिओ’णे जाहीर केलेल्या योजेनेचे हे जगभरातील सर्वांत कमी दर असून, बिलात जादा शुल्काचा धक्का मिळणार नाही. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या (एमएनपी) पर्यायाचा अवलंब करता येणार आहे; तसेच सीम अॅक्‍टिव्हेशनसाठी होम डिलिव्हरीची सुविधा आणि केवळ पाच मिनिटांची ई-केवायसी प्रक्रिया होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search