Next
भारत चीन दरम्यान व्यापारसंबंधांमध्ये सुप्त सामर्थ्य
पुण्यात सातवे चायना इंडिया फोरम संपन्न
BOI
Saturday, October 27, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this article:

चायना इंडिया फोरमच्या उद्घाटनप्रसंगी सीपीएएफएफसीच्या उपाध्यक्ष लिन यी, जयकुमार रावळ, राजीव पोदार, प्रदीप भार्गवा, ली बेजिंग, वांग ह्युईयोंग, जियांग जेलिन, सत्यगिरी ग्रुपच्या एंटरप्राइज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे दिनेश जोशी आदी.

पुणे : ‘आगामी काळ हा आशियाचा खास करून भारत व चीनचा असून, एकमेकांस पूरक व सहकार्याचा मार्ग अवलंबिणे गरजेचे आहे’,असे मत तज्ञांनी येथे व्यक्त केले. द इंटरनॅशनल बिझनेस लिंकेज फोरम (आयबीएलएफ) व फॉर्च्युन प्लस तर्फे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅँड अॅग्रीकल्चरच्या सहकार्याने सातव्या चायना इंडिया फोरमचे  पुण्यात हयात रिजन्सी येथे आयोजन करण्यात आले होते. 

महाराष्ट्र राज्य सरकार या परिषदेचे पोस्ट पार्टनर स्टेट असून, चायनीज पीपल्स असोसिएशन फॉर फ्रेंडशीप विथ फॉरेन कंट्रीज (सीपीएएफएफसी), चायना इंडिया फ्रेंडशीप असोसिएशन (सीआयएफए) व पोदार एंटरप्राइजच्या संयुक्त विद्यमाने ‘जॉईंटली शोल्डर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अवर टाईम्स, प्रमोट ग्लोबल ग्रोथ’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद झाली.

या वेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, पोदार एंटरप्राइजेसचे व्यवस्थापकीय संचालक राजीव पोदार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅँड अॅोग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, चीनच्या भारतातील राजदूतावासामधील आर्थिक व व्यावसायिक सल्लागार ली बेजिंग, हेबे प्रोव्हीन्स पीपल्स काँग्रेसचे उपाध्यक्ष वांग ह्युईयोंग, जिलिन प्रोव्हीन्स पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्ष व चायना स्टेट कौन्सिलचे माजी उपसचिव जियांग जेलिन, सीपीएएफएफसीच्या उपाध्यक्ष लिन यी आणि सत्यगिरी ग्रुपच्या एंटरप्राइज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे दिनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी जयकुमार रावळ म्हणाले, ‘चीन आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचे हे ६८ वे वर्ष आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक गोष्टी या सामाईक आहेत. जगात सगळीकडे या देशांमधील डॉक्टर्स, आयटी व्यावसायिक, शास्त्रज्ञ यांनी आपला ठसा उमटविला आहे;तसेच दोन्ही देशातील लोक कष्टाळू आहेत.पुढचा काळ हा आशियाचा असून, एकमेकांना पूरक व सहकार्याने वाटचाल करणे गरजेचे आहे. भारतामध्ये उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, भाषाकौशल्य व चीनमध्ये मनुष्यबळावर वाढणारा खर्च यामुळे भारताला गुंतवणूकीच्याबाबतीत फायदा होऊ शकतो. यामुळे ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना विस्तारण्याची गरज असून, चीनी कंपन्यांनी भारतात उत्पादनाची निर्मिती केल्यास दोन्ही देशांना फायदा होईल.चायना इंडिया फोरममुळे यातील नवीन संधी ओळखण्यास मदत होईल.दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान,पायाभूत सुविधा, उत्पादन, स्मार्ट सिटीज, टूरिझम अशा अनेक क्षेत्रांत सहकार्य होऊ शकते.

राजीव पोदार म्हणाले, ‘चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापार भागीदार असला तरी, दोन देशांमधील व्यवसायवाढीसाठी व्यापाराव्यतिरिक्त तंत्रज्ञान, अभिनवता, पायाभूत सुविधा, उत्पादन अशा विविध क्षेत्रांमध्ये सुप्त सामर्थ्य असून त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन परिषदांमध्ये एकूण आठ सामंजस्य करार झाले,त्यातील तीन हे पुढील वर्षी प्रत्यक्षात येत आहेत. दोन्ही देश हे जगातील सर्वांत वेगाने वाढणार्याआ अर्थव्यवस्था आहेत.चीनला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड तर भारताला बॅक ऑफिस ऑफ द वर्ल्ड म्हणतात. चीन हे हार्डवेअरवर लक्ष केंद्रित करते, तर भारताचे कौशल्य हे सॉफ्टवेअर व सेवा क्षेत्रात आहे.भारताचे उच्च दर्जाचे कौशल्य चीनच्या कमी खर्चात मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याशी जोडले गेल्यास जागतिक बाजारपेठांसाठी हे सर्वोत्कृष्ट संयोजन होईल. सध्या दोन्ही देशांमधील व्यापार हा ८४.४ बिलियन डॉलर इतका असून, त्यात भारताचा वाटा फक्त दहा बिलियन डॉलर्स इतका आहे. ही व्यापारातील दरी भरून काढण्याची गरज आहे.’

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅदन्ड अॅचग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा म्हणाले, ‘ही परिषद फक्त व्यवहारासाठी नाही. दोन्ही देशांमधील संबंध हे बहुआयामी असणे गरजेचे आहे.आर्थिक संदर्भाच्या दृष्टीने भारत व चीन हे जगाच्या केंद्रस्थानी झाले पाहिजेत.दोन्ही देशांच्या सहकार्यासाठी हीच योग्य वेळ आहे.’


सीपीएएफएफसीच्या उपाध्यक्ष लिन यी यांनी चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय होत असलेले बॉलीवूड चित्रपट,भारतीय खाद्यपदार्थ आणि योगा याचा दाखला देत चीन व भारतातील व्युहात्मक भागीदारी ही महत्त्वाची आहे,असे सांगितले.

चीनच्या भारतातील राजदूतावासामधील आर्थिक व व्यावसायिक सल्लागार ली बेजिंग म्हणाले, ‘भारत व चीनमधील व्यापारामध्ये या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान १५ टक्के वाढ झाली असून, वर्षाअखेर ९० बिलियन डॉलरकडे वाटचाल करत आहे. दोन्ही देशांमध्ये होत असलेला शांतीपूर्ण विकास हा महत्त्वाचा आहे. चीनवर अमेरिकेकडून व्यापार निर्बंध आल्यावर भारतातील काही उत्पादनांना संधी निर्माण झाली आहे.त्यामध्ये भारतातून नॉन बासमती तांदळाची निर्यात सुरू झाली आहे व काही काळात भारतीय औषधे देखील चीनमध्ये येतील.चीनने भारतात होम अप्लायन्सेस, मोबाईल फोनमध्ये गुंतवणूक केली असून, भारतातील चित्रपट व योगा हे चीनमध्ये लोकप्रिय होत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search