Next
राहुल इनामदार यांची ‘माउंट एव्हरेस्ट’वर यशस्वी चढाई
BOI
Friday, May 31, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  पुण्याची नवी ओळख ही ‘एव्हरेस्ट शिखरवीरांचे शहर’ म्हणून रुजत आहे. याच शृंखलेत या वर्षी भर पडली ती राहुल इनामदार यांची. पुणे स्थित सँडविक एशिया कंपनीमध्ये वरिष्ठ हुद्द्यावर कार्यरत असलेल्या राहुल यांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एव्हरेस्ट’ (उंची: ८८४८ मी) वर २३ मे रोजी सकाळी साडे पाच वाजता यशस्वी आरोहण केले. 

राहुल गेली दोन वर्षे एव्हरेस्टसाठी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करत होते. गेल्या काही वर्षांपासून ते  गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माउंटेनिअरिंग (जि.जि.आय.एम) संस्थेशी संलग्न असून, बेसिक रॉक क्लायंबिंग व अॅडव्हान्स रॉक क्लायम्बिंग हे कोर्सेसमध्ये त्यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. इनामदार यांना एव्हरेस्ट शिखरवीर व ‘जि.जि.आय.एम’चे ऑपरेशन्स हेड भूषण हर्षे, तसेच ‘जि.जि.आय.एम’चे साहस अभ्यासक्रम प्रमुख व कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई करणारे विवेक शिवदे यांनी मार्गदर्शन केले.

 जि.जि.आय.एम. व गिरीप्रेमीच्या माध्यमातून आयोजित ‘माउंट आयलंड शिखर’ मोहिमेमध्ये इनामदार सहभागी झाले होते. ६१८९ मीटर उंच असलेल्या या शिखरावर इनामदार यांनी यशस्वी चढाई केलेली आहे;तसेच भारतीय हिमालयामध्ये स्थित स्टोक कांगरी या ६१५४ मीटर उंचशिखरांवर चढाई केली आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकदेखील त्यांनी पूर्ण केला आहे. 

‘गिरीप्रेमी व ‘जि.जि.आय.एम’च्या मार्गदर्शनामुळेच एव्हरेस्ट शिखर चढाईचे आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न साकार झाले,’ असे इनामदार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Malini A Patel...Say Jayswaminarayan Congratulations. About 82 Days ago
Mata Pita Na Aasirvad.. Shivu Na Support Vadilo Ni Subhachha..Friendes Na Pyare Ne Rahul Nu Aattmbal Dhages Ek Gol Achhive Karvani Mahenat .. Ne Mountain Mate Respact Love Thi Aa Succsese . MALI SATHE SAUTHI MOTO SOPPORT SANDVIC INDIA NO CHE . BHAGVAN SWAMINARAYAN RAHUL NI SARVE MANOKAMNA PURN KARE EJ PRARTHANA..JAI HO.JAYHIND...
0
0

Select Language
Share Link
 
Search