Next
एजीएफ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पुण्याच्या ह्रषीकेश मोरेला कांस्यपदक
BOI
Tuesday, December 04, 2018 | 02:51 PM
15 0 0
Share this story

ऋषिकेश मोरेचा सत्कार करताना पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल,सागर आरोळे, अभिजित गायकवाड, शुभांगी चव्हाण आदी

पुणे : अझरबैजानची राजधानी बाकु येथे पार पडलेल्या एफआयजी जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप एजीएफ ट्रॉफी स्पर्धेमध्ये पुण्याच्या ह्रषीकेश मोरेने अॅक्रोबॅटिक्समध्ये कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी सागर आरोळे, अभिजित गायकवाड, शुभांगी चव्हाण, शैलेश दातार, इर्शाद शेख, अभिजित गवळी, सायली महाराव आदी उपस्थित होते.

भारताकडून २३ प्रतिनिधी या स्पर्धेसाठी गेले होते. त्यापैकी चार प्रतिनिधींनी कांस्यपदकाची कमाई केली असून, त्यात ह्रषीकेश मोरेचा समावेश आहे. तो सध्या भारतीय लष्कराच्या बेंगळुरू येथील एमइजी विभागात कार्यरत असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्याने अॅक्रोबॅटीकमध्ये कौशल्य प्राप्त केले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या ह्रषीकेशला त्याची आई अनिता मोरे यांनी धुण्याभांड्याची कामे करून वाढवले. लहानपणापासूनच त्याचा खेळाकडे कल असल्याने त्याला जिम्नॅस्टिक्स खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानेही अथक मेहनत करून यात विशेष नैपुण्य प्राप्त केले. सराव आणि जिद्दीच्या जोरावर त्याने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून देशासाठी पदक मिळवले. 

या पुढेही देशासाठी खेळून सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा ह्रषीकेशने या वेळी व्यक्त केली.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link