Next
उपेंद्र भट सादर करणार ‘भीमसेनी बंदिशी’
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

उपेंद्र भटपुणे : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या आणि त्यांच्या स्वतंत्र शैलीमुळे त्यावर वेगळा ठसा उमटलेल्या बंदिशी नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने येथील आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ‘भीमसेनी बंदिशी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य उपेंद्र भट हे या बंदिशी सादर करतील.

ही मैफल मंगळवारी (ता. दोन ऑक्टोबर) गणेश खिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व स्मारकात सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, तो सर्वांसाठी खुला असणार आहे.

पंडित भीमसेन जोशीपारंपरिक बंदिशी या त्या त्या घराण्यातील अनेक कलाकार अनेकदा गात असतात आणि त्या म्हणूनच आपल्या लक्षात राहतात; मात्र भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीमुळे त्यांनी गायलेल्या बंदिशीही नंतर केवळ त्यांनी गायलेल्या म्हणूनच रसिक श्रोत्यांच्या लक्षात राहिल्या अशी पुष्कळ उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. हे लक्षात घेत पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या या बंदिशी त्यांचे शिष्य उपेंद्र भट हे श्रोत्यांसमोर सादर करणार आहेत. यामध्ये मुख्यत: मारवा, पुरियाधनश्री, यमन कल्याण, शुद्ध कल्याण, दुर्गा, केदार, दरबारी, मालकंस, अभोगी या रागांच्या बंदिशींचा समावेश असणार आहे. पंडितजींची नाममुद्रा उमटलेल्या बंदिशी सादर करतानाच उपेंद्र भट हे त्यामध्ये पंडितजींनी नेमके काय वेगळे केले, हेही सांगणार आहेत. या वेळी त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे, तर तबल्यावर सचिन पावगी साथसंगत करतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search