Next
‘हिरकणी’च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी
BOI
Wednesday, September 25, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रायगडाचा दुर्गम कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीची कथा आजही लहानथोरांना रोमांचित करते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून वर्षोनुवर्षे भेटणारी ही धाडसी ‘हिरकणी’  येत्या २४ ऑक्टोबरला चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुपेरी पडद्यावरची ही ‘हिरकणी’ आहे सोनाली कुलकर्णी. 

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, यातील ‘हिरकणी’ कोण याबाबत उत्कंठता होती. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 


विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे. राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search